आ. शशिकांत शिंदे यांनी सरकारवर सोडले टीकास्त्र
कोरेगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामात स्लॅब कोसळला, त्यावर पालकमंत्र्यांनी तेथे जाऊन पाहणी केली आणि जिल्हाधिकार्यांना चौकशीचे आदेश दिले, तोपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना दिल्या. त्याचा अहवाल येईपर्यंत ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे काम करु नये, असे सांगितले असताना देखील हे काम सुरु झाले असेल काय ?, जर झाले असेल तर त्या पाठीमागील कारण काय ? हे स्पष्ट करावे. पालकमंत्र्यांचा अवमान होत असेल किंवा पालकमंत्र्यांनी सांगितल्यानंतर काम सुरु झाले असेल तर चौकशी करुन उत्तर द्यावे, अशी जोरदार मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत केली.
तारांकीत प्रश्नांच्यावेळी आ. शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घालून सरकारवर टीकास्त्र सोडले. केवळ राज्य सरकारच नव्हे तर त्यांनी भारतीय राजमार्ग विकास प्राधिकरणाला लक्ष्य करत केंद्र सरकारवर देखील टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आ. शिंदे यांना जोरदार समर्थन दिले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारच्या भारतीय राजमार्ग विकास प्राधिकरणाच्या नियंत्रणामध्ये असल्याने राज्य सरकारचे त्यावर नियंत्रण आहे काय ?, राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करुन या प्रश्नासंदर्भात निर्णय घेऊ शकत आहे काय ?, भुईंजमध्ये उड्डाण पुलाचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, पालकमंत्र्यांनी तेथे जाऊन कामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले होते, त्याचा अहवाल येईपर्यंत ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे काम करु नये, असे सांगितले असताना देखील हे काम सुरु झाले असेल काय ?, जर झाले असेल तर त्या पाठीमागील कारण काय ? हे स्पष्ट करावे. पालकमंत्र्यांचा अवमान होत असेल किंवा पालकमंत्र्यांनी सांगितल्यानंतर काम सुरु झाले असेल तर चौकशी झालीच पाहिजे, ही चौकशी करुन राज्य सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी आ. शिंदे यांनी केली.
या महामार्गावर सतत अपघात होत आहेत, करारामध्ये काम पूर्ण करण्याचा कालावधी नमूद असतो, त्याचे स्पष्टीकरण सरकारने करावे. कामामध्ये विलंब होत राहिल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचा दोष ठेकेदाराबरोबरच भारतीय राजमार्ग विकास प्राधिकरणाकडे अर्थात केंद्र सरकारकडे जातो. मृत व्यक्तींना आपण नुकसान भरपाई देणार का ?, सहा पदरीकरणाचे काम सुरु असताना रस्त्याच्या मधेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर उभे आहेत, त्यावर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतले आहेत, त्यावर अद्याप कोणतीही आणि कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. चालू काम असताना पुलाचा स्लॅब कोसळला, त्यामागील कारण शोधून काढून चौकशी करणार आहात काय ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महामार्गावरील भुईंजच्या उड्डाणपुलाच्या बांधकामावरुन तारांकीत प्रश्न
RELATED ARTICLES