सातारा :- सर्वसामान्य माणसांना सत्तेचा फायदा व्हावा. हाच हेतू सरकारचा असावा. परंतु ,अलीकडच्या काळात भांडवलदारांची हित पाहणाऱ्या सरकारमुळे सर्वत्र निराशा पसरलेली आहे. एवढेच नव्हे तर सातारा नजीक असणाऱ्या महामार्गावरील पुलाखाली देव घडवणाऱ्या हाताला आता बेघर होण्याची वेळ आली आहे.
बाबत माहिती अशी की ,छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात वीस वर्षांपूर्वी राजस्थान व गुजरात राज्यातून पाच सहा कुटुंब आले होते .त्यांचा विस्तार होऊन आता या ठिकाणी सुमारे वीस कुटुंबीय पुणे बंगलोर महामार्गावरील राष्ट्रीय पुलाखाली अगदी गरिबीत दिवस काढत आहेत. त्यांना कोणतीही सुविधा नाही. तरीही दिवसभर आपल्या हाताने देव व युगपुरुष मूर्ती बनवून ते विकण्याचा ते व्यवसाय करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या या सातारा शहरात ते विसावले आहेत. या ठिकाणी मातीचे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले व अनेक किल्ले प्रतिकृती तयार करीत आहेत. त्याला मोठी मागणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी याच पुलाखाली आपले संसार थाटले आहेत. त्यांच्याकडे फक्त वीस वर्षे राहिल्याचा त्यांच्या परिस्थितीवरून अनुभव असला तरी त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रे नाहीत. ही कागदपत्र तयार करण्यासाठी अद्यापही कोणी जवळ आलेले नाही. एवढेच नव्हे तर दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचा अंत्यविधी करताना अनेक अडचणी येतात. आता तर या पुलाखाली सातारा नगर पालिका मार्फत बगीच्या बनवण्याचे टेंडर पास झालेले आहे.
या टेंडरच्या मलिदातून अनेकांना सुखाची झोप लागणार आहे .परंतु ,गोरगरीब व कष्टकरी या परप्रांतीयांची झोप उडालेली आहे. पुढच्या पिढीच्या काळजीने त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची झालर दिसत आहे .आतापर्यंत त्यांनी अनेकांना आपला प्रश्न सांगितलेला आहे. पण उत्तर सापडलेले नाही. काही कार्यकर्त्यांनी मानवता भावनेतून त्यांना एका लोकप्रतिनिधीची भेट घ्यावी. म्हणून त्यांना सल्ला दिला. परंतु ,जशा पद्धतीने विठ्ठलाला भेटण्यासाठी जसे बडवे आडवे येतात. त्या पद्धतीने काही बडव्यांनी त्यांना लोकप्रतिनिधीला भेटून दिलेलं नाही .
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली अत्यंत गरिबीत देव घडवणारे कारागीर जगत आहेत. त्यांना कोणतीही नागरिक सुविधा मिळणे अशक्यच आहे. पण, सणासुदीला सुद्धा त्यांना गोडधोड जेवण मिळत नाही. सध्या हिंदुत्वाचा नारा दिला जातो. एकाद्या शुभ कार्याला श्री गणरायाची पूजा केली जाते. पण, याच गणरायाची मूर्ती घडवणाऱ्या कारागिरांना मात्र हातांना देव पावत नाही. हे सत्य समजत आहे. पण, कुठेतरी अशीच किरण म्हणून आपलं पुनर्वसन होईल. अशी त्यांना आशा वाटत आहे.
या गोरगरिबांना हिंदू असल्याचा अभिमान वाटत असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी हा अभिमान काय कामाचा? असा मार्मिक प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या केंद्रात व राज्यात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार आल्यामुळे गोरगरीब हिंदूंना गर्वसे को हम हिंदू आहे हे बोलताना संकोच वाटत आहे. निदान त्यांचा संकोच दूर करण्यासाठी तरी त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ओव्हाळ, मदन खंकाळ, अमोल गंगावणे यांनी केली आहे. यातील काही मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी सातारा येथील काही शिक्षकांनी तसेच ज्ञानेश्वर कांबळे यांनी यातील मुलांना शाळेत प्रवेश देण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक पिढी शिक्षणा कडे वळली आहे.
मराठी भाषेत एक वाक्य आहे. देवाला भिकाऱ्यासमोर यायचे असेल तर भाकरीच्या रूपानेच यावे लागेल. अन्यथा सर्व थोतांड आहे. मात्र या गोरगरिबांसाठी मानवाच्या रूपातून देव धावून येतो का? की खरचं थोतांड आहे.याची परिक्षा दयावी लागत आहे. या पुलाखाली असलेल्या कुटुंबीयांना काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा खूप मोठा दिलासा असला तरी शेवटी लोकशाही मार्गाने त्यांचे पुनर्वसन व्हावे. यासाठी ते सुद्धा प्रयत्नशील आहेत. ही बाब कौतुकास पात्र ठरली आहे.
देव घडवणाऱ्या कारागिरांना साताऱ्यात आता पुन्हा व्हावे लागेल बेघर ?
RELATED ARTICLES