कराची : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि राजकीय नेता इम्रान खानने तिसरे लग्न केले आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रानने नुकतेच लंडनमध्ये एका साध्या समारंभात हे लग्न केले. त्याच्या नव्या पत्नीचे नाव मरियम आहे. दरम्यान, इम्रानचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) ने हे वृत्त फेटाळले आहे. जसे की, रेहमसोबत लग्न झाल्यानंतर इम्रानने हे वृत्त फेटाळून लावले होते व नंतर मान्य केले होते. कोण आहे मरियम…
– मरियम इम्रानची आध्यात्मिक गाईड बुशरा हिची बहिण आहे.
– बुशरा पाकपट्टन (पंजाब) मधील मेनका फॅमिलीची सून आहे. बुशराचे पती खवार फरीद मेनका कस्टम विभागात अधिकारी आहेत.
– दिलेल्या वृत्तानुसार, मरियम ही सुद्धा घटस्फोटित आहे. तिला दोन मुले आहेत तर इम्रान खान 63 वर्षाचा आहे.
पहिले लग्न : पाकिस्तानी-ब्रिटिश पत्रकार जेमिमा
– इम्रानची पहिली पत्नी पाकिस्तानी-ब्रिटिश पत्रकार जेमिमा गोल्डस्मिथ होती.
– 1965 मध्ये दोघांचे लग्न झाले मात्र 2004 मध्ये दोघे वेगळे झाले.
– तिच्यापासून इम्रानला दोन मुले- सुलेमान आणि कासिम आहेत.
दूसरे लग्न : रेहम खान
– यानंतर इम्रानने 42 वर्षाची रेहम खानसोबत जानेवारी, 2015 मध्ये लग्न केले.
– रेहम सुद्धा जर्नालिस्ट आहे. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये इम्रानने तिला घटस्फोट दिला.
63 वर्षाचा पाकिस्तान क्रिकेटर इम्रानने केले तिसरे लग्न!
RELATED ARTICLES