फलटण : आज फलटणमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. बरड ग्रामपंचायत लिपिक अनंत हरिभाऊ लंगूटे, वय 32 राहणार- लंगुटे वस्ती, बरड व जिल्हा परिषद बांधकाम विभाग फलटण येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रफुल्लकुमार हणमंतराव भोसले वय 35 सध्या राहणार- संजीवराजे नगर फलटण, मूळ राहणार- संगमनेर तालुका भोर जिल्हा पुणे यांना 5000 रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल कामाचा मूल्याकन दाखला पंचायत समिती फलटण येथे पाठवल्याच्या मोबदल्यात तक्रारदार याला 5000 रुपये रकमेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून आज बरड येथे आली व यांना फलटण येथे अटक करण्यात आली आहे.
घरकुल कामाचा मूल्याकन दाखला मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी पैसे मागितले असून ते द्या म्हणजे तुमचा चेक काढला जाईल असे म्हणत बरड ग्रामपंचायतचा क्लार्क अनंत लंगूटे हा अनेकाना पैसे मागत असे मात्र आज लाचलुचपत अधिकार्यांनी त्याला ग्रामपंचायत कार्यालय समोर रंगेहात पकडला असून त्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रफुल्लकुमार भोसले यालाही अटक करण्यात आली.
गेली अनेक वर्षे बरड ग्रामपंचायत वर प्रशासक असल्याने ग्रामपंचायत लिपिक लंगूटे याचा फायदा घेत भरपूर पैसे कमावले मात्र आज तो लाचलुचपत अधिकार्यांनी लावलेल्या जाळ्यात अलगद सापडला असून त्याने आज फलटण येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रफुल्लकुमार भोसले यांचे नाव घेतल्याने त्याला ही लाचलुचपत खात्याने जाळ्यात सापडला आहे.
बरड ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षे प्रशासक नेमला होता या काळात अनेक अशा लेखी व तोंडी तक्रारी झाल्या होत्या यामुळे लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी ग्रामपंचायत विभाग, जिल्हापरिषद बांधकाम विभागा, पंचायत समिती फलटण या ठिकाणाहून संबंधित प्रकरणी संशयित संपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
आजअखेर कोणत्या अधिकारी याच्यासाठी लाभार्थ्यांकडून लंगूटे यांचेकडून पैसे घेत होता व कोणा कोणाला देत होता त्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभाग घेत असून अनंत लंगुटे व प्रफुल्लकुमार भोसलेच्या घराची व बँक खात्याची चौकशी लाच लुचपत प्रतिबंध विभाग करीत असून लंगूटे प्रमाणे अनेक लिपिक व ठेकेदार हे पंचायत समिती व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना पैसे देत असून दोन्ही विभागाचे अधिकारी हे लाचलुचपतच्या रडारवर आहेत. सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलिस उपअधिक्षक सुहास गाडगौडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे ,पो.काँ.अजित कर्णे,प्रशांत ताटे,संभाजी काटकर वविशाल खरात यांनी केली.