(दै. ग्रामोद्धार) सातारा : गौरीशंकर नॉलेज सिटीच्या कार्यालयात जाऊन एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामेन असल्याचे सांगून पैसे मागून फसवणूकीचा प्रयत्न केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद गौरीशंकरचे प्रशासकीय अधिकारी नितीन श्रीरंग मुडलगीकर वय 57 रा. कोटेश्वर कॉलनी सातारा यांनी दिली आहे. तर या प्रकरणी अमोल मधुकर घाडगे रा. ढबेवाडी ता. सातारा याला पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल दि 1 नोव्हेंबर 16 रोजी फिर्यादी नितीन मुडलगीकर हे आपल्या कार्यालयात काम करीत होते. दरम्यान 4 वा. संशयीत आरोपी अमोल घाडगे हा कार्यालयात येवून मी एका नॅशनलवृत्तवाहिनीचा कॅमेरामन असून माझ्या आत्तेभावाचा उंब्रज येथे अपघात झाला आहे. त्यात तो मयत झाला आहे. तरी मी एका महिला खासदारांबरोबर माझे बोलणे झाले असून गौरीशंकरचे चेअरमन मदनराव जगताप यांच्याकडून आर्थिक मदत घ्यावी असे त्या महिला खासदारांनी सांगितले आहे. तरी मी आर्थिक मदत घेण्यासाठी आलो आहे. तरी मला आर्थिक मदत घ्यावी. नितीन मुडलगीकर यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अमोल घाडगे यास पोलीसांच्या हवाली केले. अमोल घाडगे याच्या विरोधात पैशाच्या उद्देशाने तोतयागिरी करून फसवणूकीचा प्रयत्न केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास ए.एस. आय. पवार करीत आहेत. (दै. ग्रामोद्धार)