पाल ः सातारा जिल्हा गेल्या दहा वर्षापासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. मात्र यापुढे येथील जनतेच्या सुरक्षतेचची जबाबदारी माझील राहील. म्हणूनच जिल्ह्यातील दहशत मोडीत काढण्यासाठी जनतेने परिवर्तन घडवून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन शिवसेना, भाजपा, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णसाहेब पाटील यांनी केले.
पाल ता. कराड येथे महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड उत्तर भाजपा नेते मनोजदादा घोरपडे, माजी सभापती हिंदुराव चव्हाण, कराड उत्तर कार्याध्यक्ष महेश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक रामकृष्ण वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. नरेंद्र पाटील म्हणाले, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सरकार किती भक्कम आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे दहशतवादी हल्ल्यास केलेले प्रत्युत्तर. जगात देश महासत्ता बनविण्याचे काम फक्त आणि फक्त मोदी सरकार करू शकते. देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर महायुतीला साथ देणे गरजेचे आहे. देशात विविध विकास कामे राबवून जनेसेवे व्रत हे सरकार करत आहे. देशात व राज्यात सेना, भाजप युतीचे सरकार आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील विद्यमान खासदार कोट्यावधी निधी आणल्याची वल्गना करत आहेत. पण ते हे सांगत नाहीत, हा निधी कोणीला दिला. विकासचे काम सेना, भाजप युती करत असताना ह्या विरोधी पक्षातील आमदारांनी निधी कोठून आणला हा मोठा प्रश्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सर्वात प्रथम स्व. अण्णासाहेब पाटील यांनी आवाज उठवला होता. तरीही आरक्षण मिळाले नाही. त्यावेळी पासूनचे आरक्षण हे तुम्हाला आता केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारच्या माध्यमातूनच मिळाले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये विकास कामे व्हायला पाहिजे होते तेवढी अद्याप झाली नाही याला कारणीभूत म्हणजे फक्त विद्यमान खासदार आहेत. कोल्हापूरला आमचे मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील जर टोल मुक्त करत असतील तर सातारचे विद्यमान खासदार यांनी आतापर्यंत सातारकरांसाठी टोलमुक्त का नाही केले. जिल्ह्यामध्ये मोठी धरणे असूनही जिल्ह्यातील दुष्काळ ह्या विद्यामन खासदाराना का हटविता आला नाही. जिल्ह्यात तरुणांची संख्या मोठी आहे. नव्या पिढीला तुम्ही कॉलर उलटी करण्याचा आदर्श देण्यापेक्षा चांगला आर्दश द्या, असेही पाटील यांनी सांगितले.
ना. शेखर चरेगावकर, पुन्हा एकदा भारतात मोदी सरकार निवडून येणार आहे. दिल्लीत नरेंद्र आणि योगाने सातार्यातही नरेंद्र आहेत. पाच वष पूर्वीचे वृत्तपत्र काढून बघा आधीच्या सरकारचे अनेक घोटाळे पाहायला मिळतील. मात्र या सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकर्यांना चांगला भाव दिला आहे. शेतकर्यांचा विचार करणारे फक्त हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे. या सरकारने कोणत्याच गोष्टीचा विचार न करता चांगल्या कामासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. ज्याला स्वतःची सुरक्षा ठेवता येत नाही ते हा देश काय चालवणार असा टोला ना. चरेगावकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. जिल्ह्यातील बंद पडलेले योजना विधानसभेच्या पूर्वीच सुरू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसून त्याशिवाय विधानसभेचे मते मागायला येणार नाही. अनेक चांगल्या योजना या सरकारने चालू केले आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या योजना या सरकारने चालू केले आहेत, असे सांगत त्यांनी मतदारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. येत्या 23 तारखेला नरेंद्र पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे सांगितले.
विक्रम पावस्कर म्हणाले, खासदार हा मिशीवाला पाहिजे. सामान्य जनतेचा विचार करणारा खासदार हा सातारा जिल्ह्याला पाहिजे. विकासाला मते म्हणजे नरेंद्र पाटील यांना मत आणि नरेंद्र पाटील यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत असे सांगून ते म्हणाले, आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामे रखडली आहेत. अद्याप ती पूर्ण झाली नाहीत व ती करण्याचाही प्रयत्न कुणी केला नाही. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिल्लीला पाठवूया. नरेंद्र पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन पावसकर यांनी केले.
पाली येथे मोठ्या जोशात ढोल ताशाच्या गजरातमध्ये सातारा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नरेंद्र पाटील यांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले व नारळ फोडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर पाली या गावांमध्ये नरेंद्र पाटील यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीस येथील ग्रामस्थ, कार्यकर्त्यांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रामकृष्ण वेताळ, मनोजदादा घोरपडे, विश्वासराव काळभोर, कराड उत्तर भाजपाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, माजी सरपंच सयाजी पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक माजी उपसरपंच सुरेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार सतीश पाटील यांनी मानले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल अॅड. विशाल शेजवळ, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम गायकवाड, तालुकाध्यक्षा सूर्यकांत पडवळ, शिवसेना कराड उत्तर प्रमुख सुनिल पाटील, माजी सरपंच सुरेशतात्या पाटील, युवा नेते विश्वासराव काळभोर, संतोष पाटील, सयाजीराव पाटील-कोर्टी यांच्यासह पाल व परिसरातील शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील दहशत मोडीत काढण्यासाठी परिवर्तन घडवा ः ना. नरेंद्र पाटील
RELATED ARTICLES