सातारा : पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेला नुकताच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्यावतीने सापुतरा नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात पगारदार पतसंस्था गट क्र. 1 मध्ये व्दितीय क्रमांकाच्या दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल संस्था पदाधिकारी व संचालक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सभासदांच्या सोयीसाठी संस्था लवकरच सांगली आणि कराड या ठिकाणी कार्यालय सुरु करणार असून खंडाळा, वडूज, फलटण, वाई आणि पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरु करणार असल्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन एस. पी. जगताप, संस्थेचे व्हा. चेअरमन भाउसाहेब होनमाने व संस्थेचे सेक्रेटरी सोमनाथ जादव यांनी केले आहे.
संस्थेची वाटचाल संस्थेचे खंबीर नेतृत्व गुलाबसिंग कदम, तसेच सर्व संचालकांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली व सेवकांच्या सहकार्याने सुरु असून संस्था सर्व संचालकांच्या सहकार्याने लवकरच सभासद संपर्क मोहिम सुरु करणार अल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन एस. पी. जगताप व व्हा. चेअरमन भाउसाहेब होनमाने यांनी केले.