Wednesday, March 19, 2025
Homeठळक घडामोडीभर पावसातही महाबळेश्‍वरात पर्यटकांचा ओढा कायम

भर पावसातही महाबळेश्‍वरात पर्यटकांचा ओढा कायम

महाबळेश्वर (संजय दस्तुरे) :  महाबळेश्वर नाबाद 200 (इंच) स्थानिकांसह पर्यटकांच्यात तसेच बळीराजा मधेही समाधानचे वातावरण. उशिरा सुरु होऊन कमी वेळात डबल सेंचूरी मारल्याने सर्वत्र आनंदी वातावरण पहावयास मिळत आहे.हवामान खात्याच्या नोंदीनुसार यावर्षी 1जुन ते 11  ऑगस्ट सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत एकूण50011.5  मिमी म्हणजेच सुमारे 200 इंच पाऊस पडल्याची  नोंद  झाली आहे.
महाराष्ट्राची चेरापुंजी  म्हणून जिल्हा ओळखतात त्या महाबळेश्वर पर्यटन स्थळावरती यावर्षी या हंगामातील  पावसाची डबल सेंचूरी नुकतीच झाली असून सर्वत्र अत्यंत आल्हाददायक व प्रसन्न वातावरण पहावयास मिळत आहे. या  भिजर्‍या  महाबळेश्वरचा आपल्या कुटुंबा समवेत व कुटुंबीयां समा वेत मंत्रमुग्धपणे आनंद लुटण्यासाठी हौशी -मौजींची येथे गर्दी होत आहे.15 ऑगस्ट पूर्वीच तीन  दिवस आधीच येथील पावसाने  डबल सेंचूरी पूर्ण केल्याने यावर्षी 15 ऑगस्ट सह   आलेल्या शनिवार रविवार च्या सलग सुट्ट्या मुळे येथे येणार्‍या पर्यटकांना निसर्गाचे पावसाळ्यातील येथील सुंदर रूप पहावयास मिळणार आहे.

 

या वर्षी या चेरापुंजीत मान्सून पावसाला सुरुवात तशी उशीराच झाली. 1 जुन ते 30 सप्टेंबर हा येथील पावसाळी हंगाम असताना  यावर्षी त्याची खरी सुरुवात जून शेवटच्या आठवड्यात झाली. 1जुन ते 24 जून या कालावधीत येथे केवळ 199.3 मिमी पाऊस पडल्यची नोंद हवामान खात्याने नोंदवली. गत वर्षी कमी पावसाने होरपळलेल्या महाराष्ट्रावर पुन्हा तिच वेळ येणार का? असेच वाटत होते मात्र 25 जून पासून निसर्गाने महाबळेश्वरसह  सर्वत्रच आपली कृपा दृष्टी फिराविल्याने या हंगामातील वरुणराजाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. 25 जून ते 31 जूनपर्यंत थोडी दमदार सुरुवात होऊन महिना अखेरीस त्याने 538.4 मिमी पर्यंत मजल मारली  त्यानंतर वरूण राजाचे बरसणे संतत सुरु झाले ते आज तागायत येथे ते तसेच सुरु आहे. पावसाच्या या दमदार बरसण्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण दिसू लागले. बळीराजाही सुखावला. धरणांमध्येही पाण्याचा साठा वाढू लागला व दुष्काळातून आपली सुटका होणार याची खात्री वाटू लागली. कारण महाबळेश्वरच्या पावसावरच धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, महू आदी सुमारे पाच धरणांचे पाण्यासाठीचे भवितव्य आवलंबून असते.  यातच या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच  दिवसापासून प्रचंड धुवाधार पाऊस सुरु झाल्याने  या आकडेवारीत फार मोठ्या प्रमाणावर भर पडून त्याने आज सायंकाळी 5.30 वाजे पर्यंतच्या   अल्प कालावधीत आपले द्वीशतक पूर्ण केले.  1 ऑगस्ट 115.6 मिमी, 2 ऑगस्ट389.2 मिमी, 3 ऑगस्ट410.4 मिमी, 4 ऑगस्ट239.8 मिमी, 5 ऑगस्ट159.6, 6 ऑगस्ट 241.7मिमि, 7 ऑगस्ट 95मिमि, 9 ऑगस्ट 117.1 मिमी तर 10 ऑगस्ट 80.0  मिमी व 11 ऑगस्ट सकाळी 8.30 वाजे पर्यंत 63.2 मिमी व एकूण 4990.1 मिमी म्हणजेच 199.60 इंच  एकूण होण्या मध्ये यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे आजच्या भागीरथीच्या कन्यागताच्या मुहूर्तावर महाबळेश्वरच्या (शिव शंभुच्या) साक्षीने वरूण राजा  येथील या वर्षीच्या हंगामातील डबल सेंचूरी पूर्ण करणार असे आज सकाळ पासून पडत असलेल्या पावसामुळे वाटत असतानाच हवामान खात्याने सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंतच्या नोंदी मध्ये 26.4 मिमी ची भर घालून वरुण राजाने 1 जुन ते  11 ओगस्ट सायंकाळी 5.30  वाजे पर्यंत आपली 5011.5 मिमी ची नोंद पूर्ण केली आणि  आपले या हंगामातील येथील द्वीशतक इंच पूर्ण केले. या वर्षी येथे उशिरा पाऊस सुरु होऊन काही थोड्या दिवसांची  धुवाधार बरसात करून कमी वेळात आपली यावर्षीची डबल सेंचूरी पूर्ण केली. यामुळे येथे सर्वत्र सुंदर व आल्हाददायक वातावरण असल्याने व ही डबल सेंचूरी वरुण राजाने 15 ऑगस्टच्या सलग सुट्ट्या पूर्वीच मारल्याने येथे येणार्‍या पावसाळी पर्यटकांना खर्‍या अर्थाने पावसाळी महाबळेश्वर भिजरे महाबळेश्वरची  मौज लुटता येणार आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular