साताराः भाजप सरकारने मागील वर्षी याचदिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरला व्यवहारात सुरू असलेल्या 500 व 1000 रूपयांच्या नोटा कोणतीही पुर्वसूचना न देता अचानक बंद केल्याने मोठा जनक्षोभ निर्माण झाला. ही नोटाबंदी केल्यानंतर अनेकांना जीवही गमवावे लागले. भाजप सरकारने देशाला अच्छे दिन दाखवण्याच्या स्वप्नामध्ये सामान्यांच्या तोंडचे पाणीच पळवले. म्हणून या नोटाबंदीमुळे ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्यांचे आत्म्यास श्रध्दांजली वाहण्याच्या हेतूने सातारा येथील राष्ट्रवादी कार्यालयात या नोटांच्या प्रतिमांचे पुजन करून या नोटांचे वर्षश्राध्द घालण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे सुधीर धुमाळ, बापू इदाटे, भानुदास मोहिते, दत्तानाना उत्तेकर, राजेंद्र लावंघरे यांचेसह महिला पदाधिकारीही मोठया संख्येने उपस्थित होत्या.
(छाया – प्रमोद इंगळे )