बुध ः मोळ – पुसेगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. मोठ मोठे खड्डे जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षे भरापासुन सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची केविलवाणी अवस्था झाली आहे.
मोठे मोठे खड्डे
या रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्याने या खड्यातून मार्ग काढत जीव घेणा प्रवास करताना वाहन चालकांची चांगलीच दमछाक करत आहे.याच बुध-पुसेगाव रस्त्यावर काटेवाडी जवळ भलेमोठ मोठ खड्डे नागरीकांना त्रासदायक ठरत आहेत. याच खाड्यामुळे अनेकदा अपघात याठिकाणी होत आहेत.
वेटण ओढा पुल,रस्ता धोकादायक….
वेटण ओढा पुलावरील रस्ता अत्यंत हीन दर्जाचा असुन या रस्तामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे महत्त्वाची बाब म्हणजे या पुलाचे संरक्षण कठडे ठासळले असाल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही,अनेकदा पाठापुरावा करूनही बांधकाम विभाग दुर्घटणा घडण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरीक विचारत आहेत.
दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या खचल्या
मोळ,पासुन ताथवडा घाटापर्यंत आणि बुध पासुन तब्बल एक किमी वरील रस्त्यावरील साईड पट्या उखडल्या आहेत. जवळ जवळ फुटभरा खाली साईड पट्ट्या खचल्याने एकावेळी दोन वाहने आल्यावर चालकाची चांगलीच पंचायत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांचा या रस्त्यावर अपघात झाला असुन लवकरात लवकर या साईड पट्ट्या भरून या मोळअ- बुध- पुसेगाव रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावे अशी नागरीकांची मागणी होत आहे
बुध-मोळ-पुसेगाव रस्त्याची झाली चाळण
RELATED ARTICLES