* मान्यवरांच्या हस्ते धोम जलाशयाचे जलपुजन * धोम धरणाचे चार दरवाजे उघडले दोन फुटाने *
वाई : धोम धरण परिसरात गेली आठ दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने दहा हजार क्युसेस पाण्याची आवक धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या जलाशयात झपाटयाने वाढ होत असल्याने धोम धरण 85 टक्के भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून धरण प्रशासनाने पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
महाबळेश्वर व धरण परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास अजून जादा पाणी कृष्णा नदी मध्ये सोडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. धोम परिसरात गुरूवार व शुक्रवारी दिवसभर 113 मि.मीटर पावसाची नोंद झाली आहे.

दारम्यन धरणातील जलाषयाचे पुजन पंचायत समितीच्या सभापती उमा बुलुंगे, यांच्या हस्ते तर तहसिलदार अतुल म्हत्रे, गटविकास अधिकारी दीपा बापट, वाई पोलिस स्टेशनचे पो. निरीक्षक विनायक वेताळ, उपसभापती शोभा सणस, माजी उपसभापती शंकरराव शिंदे, शाखा अभियंता पी.एम. मांढरे, उपअभियंता आर. जी. माने, उद्योजक दिपक ओसवाल, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. धोम पाटबंधारे प्रशासनाने कृष्णा नदी काठच्या राहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. धोम धरणाच्या खालच्या परिसरात ही पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या वाईच्या महागणपती समोरील पुलावरून पाणी जात असून खबरदारीचा उपाय म्हणून तो बंद करण्यात आला आहे.