मुंबई: मंत्री आणि आमदारांच्या वेतन भत्त्यात दुप्पटीने वाढ करणारे विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. यामुळे मंत्री आणि आमदारांच्या वेतनात दुप्पट वाढ होणार आहे.
हे विधेयक मंजूर झाल्यानं मंत्र्यांना मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तर राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तसेच तर आमदारांना प्रधान सचिवांप्रमाणे वेतन-भत्ते मिळणार आहे. माजी आमदारांना किमान 50 हजार निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर दोन टर्म आमदार राहिलेल्या आमदारांना 60 हजार वेतन मिळेल. सभागृहात विधेयक मांडल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विधेयक एकमुखानं संमत करण्यात आलं आहे. आता आमदारांना १लाख ७० हजार दरम्यान तर राज्यमंत्र्यांना १ लाख ८० हजार आणि कॅबिनेट मंत्र्यांना 2 लाखांच्या दरम्यान पगार वाढ मिळणार आहे.
राज्यावर कर्जाचा डोंगर असताना आमदार आणि मंत्र्यांच्या पगारात करण्यात आलेल्या वेतनवाढीमुळे तिजोरीवर अधिक बोजा पडणार आहे.