महाबळेश्वर : महाबळेश्वरचा दिवाळी हंगाम सुरु झाला असून सर्वत्र पर्यटकांची गर्दीच गर्दी पहावयास मिळत आहे. लक्ष्मी पूजनाच्या दुसर्या दिवसा पासून या पर्यटनस्थळावर प्रती वर्षी हौशी मौजींची गर्दी होत असते. यावर्षीही ती तश्याच प्रकारे झाली आहे. या गर्दीत महाराष्ट्रासह गुजरात येथील पर्यटक मोठ्या संख्येने ग्रुप ग्रुप ने आल्याचे सर्वत्र चित्र आहे.त्यांच्या पेकेज सहलीच्या मोठ मोठ्या बस गाड्या व त्यांचे ग्रुप सर्वत्रच गर्दी ने फिरत असल्याचे सध्याचे येथील चित्र आहे.
नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव असो की, येथील विविध पॉइंट सर्वत्रच या गर्दीने हे नंदनवन फुलून गेलेले आहे. महाबळेश्वर प्रसिद्ध विविध फळांचे जेम, जेली, सिरप, चिक्की, फज तसेच, कातडी चप्पल, बूट व कातडी चीज वस्तू तसेच विविध प्रकारच्या चीज वास्तू आपल्या लाडक्यांसाठी खरेदी करण्यासाठी दिवसभर व रात्री येथील बाजारपेठही या येथे आलेल्या दिवाळी पाहुण्यांनी बहरलेली असते तर फिरण्याचा शीण घालवण्यासाठी पर्यटकांनी येथील विविध ठिकाणच्या आईस गोळा गाड्या, पेटिस, वडा, कचोरीच्या गाड्या भोवती केलेली गर्दी सार्यांच्या नजरा आकर्षून घेत असतात. ही गर्दी 8 -10 दिवस अशीच कमी अधिक प्रमाणात कायम राहील असा जाणकारांचा अंदाज आहे.
या दिवाळी हंगामात पर्यटकांसाठी पालिकेने त्याचे रे गार्डन येथील वाहनतळ विना मोबदला पर्यटकांसाठी खुले केल्याने पर्यटकांच्यात समाधानाचे वातावरण आहे. मात्र पांचगणी हून महाबळेश्वरकडे येणारा रस्ता तसेच महाबळेश्वर मधील सर्वच रस्त्यांची अवस्था गंभीर असल्याने वाहनधारक स्थानिकांसह पर्यटकांना त्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या गाड्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान तर होतेच आहे तसेच त्याचा याखराब रस्त्यांमुळे आपल्या पर्यटनाचा भरपूर वेळ वाया जात असल्याची त्यांची तक्रार ऐकावयास मिळते आहे.
दिवाळी पर्यटकांची महाबळेश्वर मध्ये प्रचंड गर्दी
RELATED ARTICLES