Friday, March 28, 2025
Homeठळक घडामोडीकोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फुटाने उघडले

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फुटाने उघडले

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा * 17 हजार 700 ययुसेकचा विसर्ग सूरु
पाटण : पाटण तालुययासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने शिवसागर जलाशयातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या शिवसागर जलाशयात 20 हजार ययुसेयस पाण्याची आवक होत असून 86.18 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी रविवार दि. 7 रोजी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी 105.26 टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटाने उचलून कोयना नदीपात्रात 15 हजार 600  ययुसेयस प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. तर शनिवार दि. 6 रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2 हजार 100 ययुसेयस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू असून एकूण 17 हजार 700 ययुसेयस पाण्याचा विसर्ग सध्या कोयना नदीपात्रात होत असल्याने कोयना नदीला पूर आला असून कोयना काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणी सोडतेवेळी कोयना धरण प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता डी. ई. बागडे, उपविभागीय अधिकारी एस. एम. चव्हाण यांच्यासह प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्‍वर, प्रतापगड, सोनाट, बामणोली, काठी, वळवण, कारगाव या 9 पर्जन्य छायेच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे शनिवार दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 1100 ययुसेयस पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तद्नंतर पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढत राहिली. त्यामुळे कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 ङ्गुटाने उचलून शिवसागर जलाशयातून 15 हजार 600 ययुसेयस पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार सुरूवातीला कोयना धरणाच्या पहिल्या व सहाव्या क्रमांकाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तदंनतर तिसर्‍या व चौथ्या आणि सर्वात शेवटी दुसर्‍या व पाचव्या क्रमांकाच्या  6 वक्र दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी ज्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे त्या प्रमाणात कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे धोरण कोयना धरण व्यवस्थापन विभागाने स्विकारले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्‍या कोयना धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीला पूर आला असून पावसाचे पाणी देखील नदीपात्रात वाढत असल्यानेसंगमनगर (धयका) येथील जुना पूल व निसरे येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर मूळगाव पुलाला पाणी लागून वाहू लागले आहे. जर धरणातून जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला गेला तर मूळगाव पूल पाण्याखाली जाण्याची शययता निर्माण झाली आहे. तर कोयना व केरा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पूररेषेत असणार्‍या नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना नदीकाठच्या काही शिवारातील पिके पाण्याखाली गेली असून या पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकरी वर्गातून व्ययत केली जात आहे. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने महसूल व पोलीस विभागाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular