कोरेगाव : सध्यस्थितीत अन्य राजकीय पक्षांकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेस पक्ष हाच सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे जनतेला कळून चुकले आहे. नजिकच्या काळात आपण आपल्यातील मतभेदांना मूठमाती देऊन पक्ष संघटना बळकट केल्यास काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्ययत केला.
सातारा जिल्हा दौर्यावर आलेल्या आ. चव्हाण यांनी शासकीय विश्रामधामावर नवनियुयत जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे व कोरेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बाचल यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद अविनाश ङ्गाळके, अॅड. जयवंतराव केंजळे, अजित पाटील -चिखलीकर, मोहन आबा भोसले, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष रवी माने, जितेंद्र भोसले, अॅड. मेघराज भोईटे, नगरसेवक रवींद्र झुटिंग, अमर बर्गे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आ. चव्हाण पुढे म्हणाले, अॅड. विजयराव कणसे व किशोर बाचल या दोघांनी काँग्रेस पक्षात बरीच वर्षे वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद व काँग्रेस पक्षसंघटनेत महत्वाच्या पदांवर काम केल्याने तनयांना राजकीय संघटनेच्या कामाचा व जनतेच्या विकासाबाबतच्या अपेक्षांची चांगली जाणीव आहे. देश, राज्य व जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीमध्ये आपण सर्वांनीच एक विचाराने काँग्रेस पक्ष बळकट केला पाहिजे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पदाधिकार्यांनी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेऊन भविष्यातील राजकारण करावे. आपण सर्वांनीच मतभेद विसरुन नेटाने काँग्रेस पक्षाला ताकद देऊया, त्यासाठी मी स्वत: सर्व तालुययांमध्ये संपर्क दौरा आयोजित करुन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात काँग्रेसला परंपरा आणि संस्कृती आहे. पक्षाने आजवर सामान्य जनता हीच केंद्रबिंदू ठेवून वाटचाल केली आहे. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची काँग्रेसची भूमिका आहे. गेले काही वर्षे जिल्ह्यातील राजकारण गढुळ झाले होते, मात्र निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षच वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे. पक्षाची ताकद आहे, ती वाढविण्याची नितांत गरज असून, त्यासाठी नव्याने पदाधिकारी निवड करण्यात आलेली आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पदाधिकार्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन जुन्या-नवीन लोकांची सांगड घालत पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आगामी काळात होणार असून, जास्तीत जास्त सदस्य निवडून आणून काँग्रेस पक्षाची मजबूत पकड दाखवून दिली पाहिजे, अशी अपेक्षा आ. चव्हाण यांनी व्ययत केली.
अॅड. विजयराव कणसे व किशोर बाचल यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाट्टेल तेवढे कष्ट घेऊन संघटना उभी करु व काँग्रेसला पूर्वीचाच नावलौकिक मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
काँग्रेस पक्षाला पुन्हा चांगले दिवस येणार : पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES