वाई : नागपंची सणाला एक वेगळे महत्व आहे. या सणाला नागदेवतेला मोठ्या भक्ती भावाने पुजत असतात. पण काही वेळा उत्सवात प्राण्यांवर अत्याचार होण्याचे प्रकार घडत असतात. हे फार दुर्दैवी आहे. अशा घटनांना पायबंद घालण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. असाच एक प्रकार वाई येथे घडला. नागपंचीच्या मुहूर्तावर चौका-चौकात दुधाच्या अभिषेकाने भिजू पाहणारा नाग अखेर सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे वन विभागाच्या कार्यालयात जाऊन विसावला. यावेळी सुई-दो-याने नागाचे तोंड शिवून त्याला टोपलीत बंद केल्याचे कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले.
वाई येथील गंगापुरी भागात नागांना दूध पाजण्याच्या निमित्ताने दोन गारुडी महिलांकडून पैसे घेत असल्याची कुणकुण लागताच काही सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी बंदिस्त टोपली उघडून बघितली तेव्हा त्यात जीवंत नाग आढळून आला. समोरच्याला चावण्यासाठी तोंड उघडता येऊ नये म्हणून त्याचे तोंड दोन्ही बाजूने शिवण्यात आले होते.
हा विकृत प्रकार पाहून कार्यकर्त्यांनी लगेच वनखात्याशी संपर्क साधला. मात्र, यात विशेष काय ? अशा अविर्भावात प्रकरण किरकोळीत काढण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा कायद्यावर बोट ठेवून सर्पमित्रांनी आक्रमक भूमिका घेतली. व तक्रार दाखल केली. अखेर नागांसह गारुड्याला वनाधीकार्यांनी वनविभागाच्या कार्यालयात स्थानबद्ध केले. दरम्यान त्या नागाचे टाके काडून त्याला पुन्हा त्याच्या अधीवासात सोडणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
नागपंची दिवशी नागाची सुटका ; प्राणी प्रेमींची सतर्कता
RELATED ARTICLES