औंधसह परिसरात डॉ आंबेडकर यांची जयंती घरात थांबून साजरी ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी घरात बसून अभिवादन !

औंध:-औंध परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणुकीचे पालन करून देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी जंयती परिसरात घरातच थांबून त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली.

कोरोनाच्या संकटामुळे डॉ. आंबेडकरांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी. त्यांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करूया, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते,त्या आवाहनाचे तंतोतंत पालन करत औंधसह गोपूज, येळीव,भोसरे,वडी, कळंबी यासह परिसरात प्रत्येक गावात घरातच साजरी करण्यात आली.यावेळी नागरिकांनी घरातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले, औंध येथील महात्मा फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे.