उरमोडी आणि टेम्भू उपसा सिंचन योजनेचे पाणी माण व खटाव तालुक्यांना सोडावे ; मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य ( खटाव व माण तालुका ) यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा -: माण व खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उरमोडी आणि टेंभू या उपसा सिंचन योजनेचे पाणी या भागात सोडणे बाबत आज मराठा क्रांती मोर्च माण खटाव याच्या माध्यमातून सातारा जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले व लवकरात लवकरात पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
माण आणि खटाव हे जिल्ह्यातील दुष्काळी तालुके आहेत . या तालुक्यात नेहमीच मार्च नंतर पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असते . त्याच बरोबर सध्याची पिके पाण्याविना जळायला लागली असून त्यात कोरोना महामारीमुळे तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे . त्यामुळे उरमोडी आणि टेम्भू योजनेचे पाणी या दुष्काळी तालुक्यांना सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्च माण खटाव याच्या माध्यमातून सातारा जिल्हाधिकारी यांना करण्यात आली .