साताराः अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदतर्फे मुंबईत झालेल्या 96 व्या नाटयसंमेलनात दोन अंकी नाटक संहिता लेखनाता सातारचे डॉ.मिलिंद सुर्वे यांनी लिहिलेल्या युथनाशिया या नाटयसंहितेस प्रथम क्रमांक मिळाला. दया मरण आणि इच्छा मरण या विषयावर ऊहापोह करणा-या या संहितेस प्रथम क्रमांक मिळाल्याने सातारच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला.
डॉ.मिलिंद सुर्वे यांनी आजपर्यंत 7 एकांकिका, 2 दोन अंकी नाटक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारच्या शॉर्टफिल्मचे पटकथा,कथा व संवाद लेखन केले आहे. या शॉर्ट फिल्मचा स्विकार नाबार्डने केला असून 14 भाषांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये डॉ.सुर्वे यांना शासनाचे अभियनाचे रौप्यपदक मिळाले असून त्यांनी लिहिलेल्या इक्वेशन अनरिसॉल्ड, उडणार घर या एकांकिकांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे.
नाटयपरिषदेमधील प्रथम क्रमांक प्राप्त युथनाशिया या नाटयसंहितेत डॉ.सुर्वे यांनी दया मरण किंवा इच्छा मरण या विषयावर ऊहापोह केला आहे. या संहितेमध्ये भारतीय कायदा आणि परदेशातील कायदा यावर भाष्य करण्यात आले आहे. नाटकाचा शेवट एका वेगळया वळणावर करण्यात आला असून कर्तव्य बजावत असताना केवळ असूयेपोटी कायद्याचा गैरवापर करणा-या समाजकंटकांचा यामध्ये डॉ.सुर्वे यांनी खरपूस समाचार घेत भावनेला आणि विश्वासाला हात घालत कायद्याचा संबंध मनुष्याच्या केवळ बाहयसंस्थेशी संबंधित नसून अंतर्गत सिस्टीमशी पण असतो यावर भाष्य केले आहे. याचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत 14 नोव्हेंबरला होणार आहे. हे यश मिळवल्याबद्दल प्रतिभा हॉस्पिटलचे सुप्रसिध्द हृदयविकार तज्ञ ड़ॉ.सोमनाथ साबळे, डॉ.प्रवीणकुमार जरग, डॉ.संजय साठे, चेअरमन डॉ.रमेश भोईटे, जे.डी.गायकवाड व सर्व संचालक तसेच सातारचे रंगकर्मी किरण माने, बाबा शिंदे, रविंद्र डांगे, संदीप जंगम, मकरंद गोसावी, प्रशांत इंगवले, वनराज कुमकर व सर्व रंगकर्मींनी डॉ.सुर्वे यांचे अभिनंदन केले.
सातारच्या डॉ.मिलिंद सुर्वे यांच्या नाटयसंहितेस प्रथम क्रमांक
RELATED ARTICLES