औंध : औंध येथे मराठा क्रांती मोर्चा समाज बांधवांच्यावतीने सिमेवर लढणार्या जवानांच्या पंचवीस कुटुंबांना मिठाईचे वाटप दिवाळी सणानिमित्त करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष अमर देशमुख, जयसिंग घार्ग, धनाजी आमले,सागर जगदाळे,बाबा गोसावी, विक्रम धुमाळ, दिपक नलवडे, भिमराव भोसले, हर्षद देशमुख, बाबा नांदुगडे, अभिजीत देशमुख, प्रा.संजय निकम, हणमंत माने व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मेजर धनाजी आमले म्हणाले ,सिमेवर लढणार्या जवानांच्या कुटुंबांना मदत करणे,अडीअडचणी सोडविण्यासाठी औंध ग्रामस्थांसह आजीमाजी सैनिक संघटना कटिबध्द असून मराठा क्रांती मोर्चा औंध विभागाच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देणार असून औंध येथे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा इतरांनी आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सागर जगदाळे, अमर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातील विविध भागातील कुटुंबाना मिठाईचे वाटप करण्यात आले.