कराड : पुण्याच्या लॅपरो-ओबेसो सेंटरचे संचालक डॉ.शशांक शाह यांना अमेरिकन डायबिटीज असोसिएशन्स 2016 विवियन फॉन्सेका स्कॉलर अवॉर्ड प्राप्त झाला. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या औषध व विज्ञान विभागाचे अध्यक्ष डेसमण्ड शाट्झ यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
विवियन फॉन्सेका स्कॉलर अवॉर्ड दक्षिण आशियाई, आशियाई अमेरिकन, हवाईचे मूळ निवासी व प्रशांत द्वीपवरील रहिवाशांवर लक्ष केंद्रीत करणारे मधुमेह संबंधित संशोधन किंवा या क्षेत्रांमधील वैज्ञानिकाद्वारे करण्यात आलेल्या संशोधनाला सन्मानित करते. नुकतेच, डॉ.शाह यांना त्यांचा सार गॅस्ट्रिक बायपास विरुद्ध 25-40 किग्रॅ/मी2 मधील बीएमआयने पीडित दक्षिण आशियाई नागरीकांमधील टाइप 2 मधुमेहासाठी वैद्यकीय लाईफस्टोईल केअर – कॉसमिड रेन्डोमाइज्ड ट्रायल, यासाठी न्यू ऑर्लियन्समधील असोसिएशनच्या 76व्या वैज्ञानिक सत्रांदरम्यान या सन्मानासह गौरविण्यात आले.
डॉ. शाह हे गॅस्ट्रिक बायपासवर लक्ष केंद्रित करणार्या मधुमेहासाठी सर्जरीवरील अनेक प्रकाशनांचे लेखक आहेत, सध्या, ते ऑल इंडिया असोसिएशन ऑफ अडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटीचे अध्यक्ष, ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि इंटरनॅशनल एक्सेलन्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत.
डॉ.शशांक शाह यांना अमेरिकन विवियन फॉन्सेका स्कॉलर अवॉर्ड प्रदान
RELATED ARTICLES