सातारा: भारताचा आघाडीचा भांडवली बाजार अर्थात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (एनएसई)ने सातार्यातील कातकरी आदिवासी जनसमूहाच्या जीवनांत सकारात्मक बदलासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
आपल्या अभिनव सामाजिक दायीत्व उपक्रमांच्या (सीएसआर) माध्यमातून एनएसई येथील दारिद्र्यरेषेखालील कातकरी आदिवासींच्या अभावग्रस्त मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्प राबवत आहे. एनएसईसमर्थित या प्रकल्पाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यातील आठ आदिवासी पाडे आणि आठ ग्रामीण क्षेत्रांमध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेद्वारे केली जात आहे.
एनएसईने या आदिवासी मुलांना साक्षरता आणि संख्यात्मक प्रावीण्यासाठी चांगले शिक्षण प्राप्त करण्यास मदत केली आहे; शिवाय त्यांना क्रीडा, सार्वजनिक संभाषण, नृत्य आणि नाट्यकला इत्यादींशी संबंधित इतर कौशल्य विकसित करण्यास प्रोत्साहनदेखील दिले जात आहे. तिरंदाजी आणि ऍथलेटिक अशी त्यांच्या पारंपरिक कौशल्य ओळखून आणि विविध धाव स्पर्धांसाठी मुला-मुलींचा सराव आणि सहभागाद्वारे प्रोत्साहन दिले गेले आहे.
ज्यात क्षेत्रीय आणि जिल्हा स्तरावर 400 मीटर रिले आणि 100 मीटरच्या धाव स्पर्धेचा समावेश आहे. यातील काही चमकदार कामगिरी केलेल्या मुलांनी मुंबईत आकाशवाणीवरील कार्यक्रमात सहभागही केला आहे. पथनाट्य वर्गवारीत या मुलांनी महापौर चषकाचा दुसर्या आणि तिसर्या क्रमांकाचे पारितोषिकही पटकावले आहे.
सातार्यात एनएसई राबवीत असलेल्या उपक्रमांना गमतीजमतींसह शिक्षण या संकल्पनेतून शिक्षण रंजन केंद्र (एसआरके)फ आणि शिक्षण मित्रफ यांचे सहकार्य लाभले असून ज्यायोगे वंचित घटकांतील मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासाची काळजी घेतली गेली आहे.
या उपक्रमांमध्ये पथनाट्य, कळसुत्री बाहुल्यांचे खेळ, चित्रकथा (चित्रांच्या सहाय्याने कथाकथन) यांच्या मदतीने तसेच जनजागरण यात्रांच्या माध्यमातून अध्ययन आणि क्रियाकलापांवर आधारीत शिक्षणाची विशेष पद्धत अनुसरली गेली आहे. यात शिक्षण मित्रांकडून विशेष भूमिका बजावली जात आहे. मुलांच्या शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणून त्यांच्यातील प्रतिभांचे पोषण करणारी, मुलांचा, पालकांचा आणि शाळांदरम्यान संवादाची दरी भरून काढणारी, शाळांच्या सहकार्याने काम करीत मुलांमधून शिक्षणाचे परिणामांना गती देण्यासाठी शिक्षण मित्र उत्प्रेरकाची भूमिका बजावत आहेत.
या उपक्रमांद्वारे हस्तक्षेप केला जाण्याआधी येथील आदिवासी मुलांमधून शाळांमध्ये भरतीचे प्रमाण खूप कमी आणि जे भरती झाले त्यांच्यात गळतीही खूप अधिक होती. तथापि प्रकल्पाच्या संघाने केलेले सहाय्य यातून आदिवासी समाजातून मुलांच्या शाळांमधील भरतीला प्रोत्साहन मिळाले असून, ही मुले शिक्षण रंजन केंद्रातही सहभागी होत आहेत.
प्रकल्पाच्या हस्तक्षेपांमुळे या वंचित मुलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक मंच प्रदान करण्यात आला आहे आणि ते अतिशय प्रेरणादायी असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यांना जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे स्वप्न पाहण्याचे धाडस मिळवून देण्याने साधलेला परिणामही अपरिमित आहे.