कराडः कोरेगाव, ता. कराड येथे बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुमारे साडेसात एकरातील उसाच्या शेतीस आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
मात्र, उपसा सिंचन योजनेच्या विद्युत पुरवठा वाहिन्याला शॉर्ट सर्किट झाल्यानेच ही दुर्घटना घडली असून या घटनेचा पंचनामा करून बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
सम्राट शिंदे, प्रकाश शिंदे, धोडींराम शेवाळे, तुकाराम शेवाळे, रवींद्र पाटील, वसंत पाटील, नाथा माने, अरुण कुंभार, सुरेश कुंभार, सीताराम कुंभार, बाळू कुंभार, अशी नुकसानग्रस्त शेतकर्यांची नावे आहेत.
कोरेगाव येथील उपसा सिंचन योजनेस विद्युत पुरवठा करणार्या वाहिनी लगतच्या शेतास सर्व प्रथम आग लागली. त्यानंतर ती वार्याबरोबर सर्वत्र पसरली. यामुळे विद्युत वाहिन्यांच्या शार्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली आहे.
वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली असून गुरुवारी या दुर्घटनेचे पंचनामे करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी शेतकर्यांशी बोलताना दिली आहे.