सातारा : महाराष्ट्र ऑर्थोपेडीक संघटनेची 34 वी राज्यस्तरीय वार्षीक परिषद 3, 4, 5 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वर येथे यशस्वी रित्या पार पडली. सातारा ऑर्थोपेडीक संघटनेच्या सभासदांनी याचे आयोजन केले होते. अंदाजे 650 हून अधिक अस्थितरोगतज्ञांनी या परिषदेमध्ये भाग घेतला होता.
या परिषदेचे उद्घाटन गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजीत पाटील यांनी दीप प्रज्वलन करुन केले. ऑर्थोपेडीक संघटनेचे राट्रिय अध्यक्ष डॉ. राम प्रभू, पद्मश्री डॉ. जॉन एब्नेजार, महाराष्ट्र ऑर्थोपेडीक संघटनेचे अध्यक्ष डॉ. राकेशचंद्र कनोजीया व सचिव डॉ. प्रकाश शिगेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन झाले. सर्व मान्यवरांचे व सभासदांचे स्वागत सातारा ऑर्थोपेडीक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजोग कदम यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. पाटील यांनी डॉक्टर व पेशंट यांच्या नात्यामध्ये जुन्याकाळामध्ये जी जवळीक होती ती राहिली नसून त्यामध्ये सुधारणा होण्याची गरज असल्याचे सांगितले. ते स्वत: अस्थिरोग तज्ञ असल्याने संघटनेच्या सभासदांपैकी कोणावरही कसलेही संकट आल्यास मी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राम प्रभु यांनी संघटनेची राष्ट्रीय स्तरावरील कार्याची माहिती दिली.
या परिषदेमध्ये अनेक तज्ञांनी भाग घेतला. 3 दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये डॉ. संचेती, डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. बाभूळकर, डॉ. ठक्कर, डॉ. काकतकर यांच्यासारख्या अनुभवी डॉक्टरांनी मार्गदर्शन करुन आपले हाडांच्या आजारावरील विचार मांडले. या परिषदेमध्ये झालेला परिसंवाद, प्रबंध वाचन यासारख्या रुग्णांच्या उपचारांविषयी उपयोगी असलेल्या अनेक बाबींवर चर्चा झाली.
ही परिषद अत्यंत यशस्वी पध्दतीने पार पडल्यामुळे उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टरांनी आयोजन समितीचे कौतुक केले. ही परिषद यशस्वी पार पाडण्यासाठी सातार्यातील अस्थिरोग तज्ञ डॉ. विलास माने, डॉ. वारुंजीकर, डॉ. लावंड, डॉ. लिमये, डॉ. क्षिरसागर, डॉ. विकास पाटील, डॉ. पोळ, डॉ. सतीश बर्गे, डॉ. अजित भोसले, डॉ. सुनिता पवार, डॉ. अशुतोष भोसले व इतर सर्वांनी विशेष परिश्रम घेतले अशी माहिती सातारा अस्थिरोग संघटनेचे सचिव डॉ. शरद जगताप यांनी दिली.