सातारा : फुटबॉल फिवर पाहता सलग तिसर्या वर्षी सातार्यात श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून दोन दिवस खासदार फूटबॉल चषकचे आयोजन शहरातील तालीम संघ मैदानावर करण्यात आहे. 11 नोव्हें. रोजी प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांच्या हस्ते उदघाटन होणार असून समारोप आणि बक्षीस वितरण लागीर झाल जीच्या कलाकारांच्या उपस्थितीत राजमाता कल्पनाराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष राजू भोसले, डी. जी. बनकर व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडणार असून अल्लाउद्दिन शेख मित्र समूह या स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची माहिती सचिन साळुंखे यांनी पत्रकाद्वारे दिली.
फूटबॉल खेळ जागतिक दर्जाचा असला तरी लोकांच्यात यंदा शासन या खेळाची जनजागृती मोठया प्रमाणात करत आहे. याचाच भाग म्हणून फूटबॉलचे सामने मोठया प्रमाणात आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी सातार्यात खासदार फूटबॉल चषकाचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यासह राज्यातील संघ या टूर्नामेंटमध्ये सहभागी होत आहेत. फूटबॉल खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातार्यात प्रयत्न होत आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून सातार्यातील खेळाडूंना स्वतःचा खेळ दाखवता यावा, म्हणून या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. 11 व 12 नोव्हेंबर रोजी सातार्यातील तालीम संघाच्या मैदानावर ही टूर्नामेंट भरवण्यात आली असून या स्पर्धेत ग्रामीण भागातील संघाचा सहभाग लक्षणीय आहे.
खासदार फुटबॉल चषक स्पर्धा खेळातील दर्जेदार आणि गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर पोचवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद आयोजकांनी व्यक्त केला.
या स्पर्धेची सुरुवात 11 नोव्हें.ला होणार असून 12 नोव्हें.ला विजेत्या संघासह उपविजेत्या संघाचा लागीर झालं जीच्या कलाकारांकडून सन्मानित करण्यात येणार आहे. सातारकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन गोलू साळुंखे यांनी केले आहे.