सातारा : नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या पाच खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले होते. या पाचही खेळाडूंची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून दिल्ली, ग्वालियर, जालंदर (पंजाब) याठिकाणी होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी हे खेळाडू रवाना होत आहेत.
दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी वेदांत नलावडे (14 वर्षाखालील मुले), मधुर भोसले (19 वर्षाखालील मुले) तर, ग्वालियर येथे होणार्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी स्वप्नील साळवी (17 वर्षाखालील मुले) हे खेळाडू महाराष्ट्र संघातून खेळणार आहेत. जालंदर (पंजाब) येथे होणार्या अखिल भारतीय आंतरविद्यापिठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी अकॅडमीची कु. प्रियंका माने आणि साजीद शेख यांची निवड झाली असून हे खेळाडू या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या सर्व खेळाडूंना अकॅडमीचे मानद एनआयएस प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी खेळाडूंचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, अकॅडमीचे पदाधिकारी हरिष शेट्टी, अमर मोकाशी, दौलत भोसले, रविंद्र होले, डॉ. राहूल चव्हाण, कॅप्टन जालिंदर साळुंखे, अंकुश माने, मोहन पांडे, जितेंद्र भोसले, मनोज चव्हाण, तन्वी जगताप, अनीता जाधव, दीपक कदम, प्रमोद जाधव, मयुर डिगे, विनोद राठोड, दीपक कदम आदी मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.