सातारा : सातारा कोरेगाव रोडवरील बाँम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपूला जवळ झुणका भाकर केंद्रामध्ये गेल्या 5 ते 10 वर्षासून बेकायदेशीर एकाने फळ विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. सातारा-पंढरपूर रस्त्याचे चौपदरीकरणाअंतर्गत असलेले झुणका भाकर केंद्राचे अतिक्रमण आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने उध्वस्त करण्यात आल्याने परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
बाँम्बे रेस्टॉरंट चौकात उड्डाण पूलाजवळ जुन्या वडाच्या झाडाजवळ असणार्या झुणका भाकर केंद्रात एकाने फळ विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. गेल्या 5 ते 7 वर्षापासून सातारा-पंढरपूर रस्त्याचे चौपदरीकरणाअंतर्गत रुंदीकरणाचे काम पुन्हा ठिकठिकाणी सुरु झाले आहे. उड्डाणपूलाजवळ वडाचे जुने झाड आज कापून टाकण्यात आले. याशिवाय या परिसरात वडापाव विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्याने वाहतुकीस अडथळा येत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी आज झुणका भाकर केंद्रासह परिसरातील अतिक्रमणे जेसीबीने उध्वस्त केली. रस्ता रुंदीकरण केल्यानंतर या परिसरात वाहतुक सुरळीतपणे सुरु होणार आहे.