विनाकारण फिरताना सापडला की डायरेक्ट कोरोना टेस्ट ; पॉजिटिव्ह आला की डायरेक्ट कोरोना सेंटर..

पाटण :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मधे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या बेफिकीर नागरीकांच्यावर आजपासून पाटण येथे धडक कारवाई होत असून.. रस्त्यावर सापडेल तिथे कोरोना टेस्ट केली जात आहे. कोरोना पॉजिटिव्ह सापडल्यास दंडात्मक कारवाई करून डायरेक्ट कोविड सेंटरला रवाना, तर निगेटिव्ह सापडल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारल्याने पाटण शहरात आज शुकशुकाट जाणवत होता. प्रशासनाच्या या कारवाईवर सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशीच कडक भूमिका प्रशासनाने राबवावी तरच विनाकारण फिरणाऱ्यांवर चाफ बसेल. असे मत व्यक्त केले.

तहसिलदार योगेश्वर टोंपे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी आज पाटण शहरात धडक कारवाईची मोहीम राबवून लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावरुन बेफिकीर फिरणाऱ्या नागरिकांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सापडला की डायरेक्ट कोरोना टेस्ट.. पॉजिटिव्ह आला की डायरेक्ट कोरोना सेंटर.. यामुळे पाटण शहरातील आजचे चित्र शुकशुकाट होते. केवळ ऐवढीच कारवाई होत नव्हती त्याबरोबर अशा नागरीकांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जात होती. आजच्या कारवाईत सुदैवाने कोनी कोरोना पॉजिटिव्ह सापडलेला नाही. मात्र बेफिकीर वागणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. असे तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी सांगितले. या कारवाईत बीडीओ श्रीमती मीना सांळुखे, पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ, पाटण पोलिस जवान, पाटण नगरपंचायत कर्मचारी यांचा सहभाग होता.