Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीसत्ताधार्‍यांचे मला ऐकावेच लागते : मुख्याधिकारी गोरे ; सातारा पालिकेत उदयनराजेची...

सत्ताधार्‍यांचे मला ऐकावेच लागते : मुख्याधिकारी गोरे ; सातारा पालिकेत उदयनराजेची भेट, घंटागाडी चालकांशी चर्चा

(छायाः प्रमोद इंगळे)
सातारा :  सातारा नगर पालिकेच्या हद्दीत कचरा उचलण्यासाठी 40 घंटागाडी चालकांनी ठेका पध्दतीने कचरा उचलण्यासाठी दुसर्‍याला ठेका दिल्याने कचरा उचलण्याचे काम बंद केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटागाडी चालकांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत सत्ताधार्‍यांचे मला ऐकावेच लागते असे वक्तव्य मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी काढल्याने उपस्थित आरोग्य सभापती, नगरसेविकांसह घंटागाडी चालक अवाक् झाले. दरम्यान पत्रकारांकडे पाहुन मुख्याधिकार्‍यांनी यु टर्न घेवून घुमजाव केले.
सातारा शहरातील घंटागाडी चालकांनी दोन दिवस संप पुकारला. त्यामुळे नगरपालिकेने कचरा उचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून संपकर्‍यांच्या दुखण्यावर मीठ चोळले. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी देत सातारा नगर पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी मंडळी बेफिकीरपणे वागत असल्याचा आरोप केला. त्यानंतर सातारचे अधिकारी किरण यादव यांच्यात दालनात घंटागाडी चालक मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती वसंत लेवे, भाजपा नगरसेविका सिध्दी पवार व आरोग्य अधिकारी कायगुडे यांच्या उपस्थितीत कचरा उचलणार्‍या घंटागाडीबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चाबाबत यादव हे जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करणार होते. परंतु तोडगा निघू शकला नाही. घंटागाडी चालकांनी दर महिना 30 हजार रूपये देण्याची मागणी केली, तर नगर पालिका सध्या खाजगी ठेकेदाराला 18 हजार रूपये देवून काम करत आहे, अशी चर्चा सात्याने होत असल्याने मुख्याधिकारी गोरे हे न्यायालयात जायचे आहे असे सांगून बैठकीतून निघून गेले. तद्पूर्वी माझ्या नातेवाईकाचा ठेका आहे, अस पालकमंत्र्यांना सांगितल्याने पालकमंत्र्यांनी मला त्याबाबत विचारणा केली, असे सांगून गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी मंडळी मला जे सांगतात तेच मला ऐकावे लागते. त्यामुळे घंटागाडी चालकांबाबत निर्णय घेवू शकत नाही अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.
भाजप नगरसेविका सिध्दी पवार यांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर आरोग्य अधिकारी कायगुडे व त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी स्पष्टपणे सांगितले की, काही नगरसेवक हे नवीन ठेकेदाराकडून काम करून घ्या, असे सांगत आहेत. जुन्या घंटागाडी चालकांचे काम चांगले आहे. परंतु संप करण्यापुर्वी त्यानी नगरपालिकेला विश्‍वासात घेतले नाही. याबाबत तोडगा काढण्यासाठी जास्तवेळ लागू नये. घंटागाडी चालकांनीही आत्मचिंतन करावे. कारण आम्ही त्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
या बैठकीला घंटागाडी चालक नितीन लावंगरे, मंगेश नामदास, शहजाद शेख, राजू नलवडे, दिपक बावधने यांच्यासह अन्य घंटागाडी चालक उपस्थित होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular