Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीशनिवार पेठेत शौचालय पाडापाडीचा उद्योग; बिल्डरचा डाव यशस्वी आणि पालिकेची बघ्याची भूमिका

शनिवार पेठेत शौचालय पाडापाडीचा उद्योग; बिल्डरचा डाव यशस्वी आणि पालिकेची बघ्याची भूमिका

सातारा : शहरातील प्रभाग क्र. 9 मधील पालिकेच्या मालकीच्या जागेतील शौचालय पाडण्यात आली आहेत. केंद्र शासन एकिकडे हागणदारीमुक्तीसाठी नागरीकांना शौचालय बांधण्याचे आवाहन करीत आहे तर दुसरीकडे पालिकेच्या मालकिची शौचालय एका बिल्डरच्या फायद्यासाठी पाडली जात आहेत. पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणार्‍या त्या बिल्डरवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली. दरम्यान संबधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिले.
पालिकेची सभा सुरू असताना प्रभाग 9 मधील पालिकेच्या मालकीची शौचालये पाडण्यात आली. ही शौचालये पाडताना पालिकेने परवानगी दिली होती का? असा प्रश्‍न या प्रभागातील नगरसेवक कल्याण राक्षे यांनी आरोग्य विभागाचे निरीक्षक साखरे, व बांधकाम विभागाला विचारला. त्यावेळी दोन्ही विभागाच्या अधिकार्‍यांनी आम्हाला शौचालय पाडल्याची माहिती नाही अशी मोघम उत्तरे देवून संबधीत बिल्डरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकार्‍यांनी केला. यावेळी नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, प्रविण पाटील यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. अधिकार्‍यांना आत्ताच त्या भागात जावून शौचालय कोणी पाडले याची खातरजमा करावी आणि संबधितांवर मालमत्तेचे नुकसान केले म्हणून फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी अधिकार्‍यांची एकच धावपळ उडाली. आरोग्य विभागाचे निरीक्षक साखरे यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली. आणि सभागृहात यावर बोलतान ते म्हणाले, शौचालये पाडण्यात आली आली असल्याचा खुलासा केला. यावर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी संबधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular