लोकसभा, विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे
सातारा महिला काँग्रेसतर्फे निवेदन
सातारा : लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जिल्हाधिकारी सातारा यांना सातारा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने दिले आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान कै. राजीव गांधी यांनी महिलांना राजकीय क्षेत्रात 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने करुन महिलांना लोकसभा, विधानसभेत 33 टक्के आरक्षण मिळण्यासाठी मसूदा तयार करुन तातडीने मंजूरी द्यावी.
यावेळी जिल्हाध्यक्षा सौ. धनश्री महाडीक, प्रदेश प्रतिनिधी सौ. रजनी पवार, अल्पना यादव, मालन परळकर, रजिया शेख, मंजिरी पानसे, सायराबानो खान, फिरदोस शेख, शहनाज खान, निलोफर भंडारी, रेश्मा शेख, तहिरा शेख, अमिना शेख, शालन लोखंडे, मंगल चव्हाण, सविता जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
लोकसभा, विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे : सातारा महिला काँग्रेसतर्फे निवेदन
RELATED ARTICLES