सातारा : नंदा जाधव ही आंतरराष्ट्रीय धावपट्टू होती व तिने सातारा जिल्ह्याचे नाव देशपातळी व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले होते. तिच्या नावाने सातारा येथे क्रीडा प्रबोधिनीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या ठरावासह क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत शासनास 3 वर्षापुर्वी पाठविलेला आहे. त्यास मंजूरी मिळावी व तिच्या जीवनावर शालेय स्तरावर पाठ्यपुस्तकात, धड्याचा समावेश करावा अशी आग्रही मागणी जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्ती उपमुख्यकार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे यांनी संभाजीनगर येथे नंदा जाधव यांचे 18 व्या स्मृतीदिनानिमित्त क्रीडा पुरस्कार वितरण व रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी केली.या प्रसंगी संभाजीनगर, खिंडवाडी, कोडोली, विलासपूर या परिसरातील नागरीकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अॅड. विजयराव कणसे होते. प्रतिष्ठान सचिव ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले यांनी प्रस्ताविक करुन नंदाचा जीवनपट उलघडला व तिने त्यावेळी केलेल्या प्रतिकुल परिस्थितीतून विविध पुरस्काराचा उल्लेख केला. या प्रसंगी राष्ट्रीय हातोडा फेक खेळाडू स्नेहा जाधव हिला नंदा जाधव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. तसेच 50 व्यक्तींनी रक्तदान करुन नंदाच्या स्मृतीला उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडताना अॅड. विजय कणसे यांनी प्रतिष्ठानने आतापर्यंत राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि नंदा जाधव हिच्या नावाने सातारा येथे क्रीडा प्रबोधीनी मान्यतेसाठी मी स्वत: पाठपुरावा करीन असे सांगितले. तसेच नंदा जाधव प्रमाणे स्नेहा जाधव ही सातार्यातील जाधव कुटुंबातील दुसरी असल्याने ती निश्चितच पुढील काळात सातार्याचे नाव उंचावेल. जि. प. सदस्या अर्चना देशमुख यांनी नंदाच्या जीवनातील अनेक आठवणी सांगून तिच्या स्मृतीला अभिवादन केले. राजेंद्र कामठे यांनी नंदाच्या जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व प्रेरणा घेवून स्नेहा जाधव हिने यश संपादन करील अशा शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने नंदाच्या नावाने मला पुरस्कार मिळाला ही बाब मला प्रेरणा देणारी असून नंदा जाधव व ललिता बाबरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझी कामगिरी उंचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करेन असे सांगितले तसेच तिचे क्रीडा प्रशिक्षक दिलीप चिचकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अॅड. सागर जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव कणसे, राजेंद्र भारती, राहुल गोडसे, विजय पाटील, ज्ञानदेव गोडसे, मुकुंद वेदपाठक, सतिश माने, देवेंद्र देशमुख, संतोष सोनमळे, दिनेश माने, महेंद्र केंजळे, सविता पवार, मानसी पोतदार, मालन परळकर, अवसरे, मोहनराव पोळ, शाहू वाके, अमित टेलर, अमित पवार यांनी यशस्वीपणे केले.
नंदा जाधव क्रीडा प्रबोधिनीचा सातारा जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाने त्वरीत मंजूर करावा : टी. आर. गारळे
RELATED ARTICLES