Friday, April 25, 2025
Homeक्रीडाअटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव

अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव

 

फ्लोरिडा : अमेरिकेत झालेल्या  पहिल्या टी20 मध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. वेस्ट इंडिजनं भारताला अवघ्या एक रननं हरवलं. २४६ रनच्या  आव्हानाचा पाठलाग करताना भारताला २० ओव्हरमध्ये २४४ रनपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या बॉलला दोन रनची आवश्यकता असताना ब्रॅव्होनं धोनीला आउट केले आणि वेस्ट इंडिजला जिंकवलं. भारताकडून के.एल.राहुलनं जबरदस्त सेंच्युरी झळकवली. राहुलनं 51 बॉलमध्ये नाबाद 110 रन केल्या, तर रोहित शर्मानं 28 बॉलमध्ये 62 आणि धोनीनं 25 बॉलमध्ये 43 रन केल्या. याआधी टॉस जिंकून भारतानं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारताच्या बॉलर्सनी मात्र धोनीचा हा निर्णय अयोग्य ठरवला. वेस्ट इंडिजच्या एविन लुईसनं 48 बॉलमध्ये सेंच्युरी झळकवली, तर जॉनसन चार्ल्सनं 33 बॉलमध्ये 79 रन केल्या. वेस्ट इंडिजनं 20 ओव्हरमध्ये 245 रन केल्या.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular