सातारा : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन योग दिनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, नेहरु युवा केंद्राचे भानुदास यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनंत इग्लिंश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, श्री अंबिका योग मंडळ, निरायम योग प्रतिष्ठाण यांच्यावतीने हेमंत बर्गे, शशिकांत देशपांडे, मारुतराव घोरपडे, आशा देशपांडे, अमोल पाटील यांनी प्राणायाम, विविध योगासने यांचे प्रशिक्षण दिले. यानंतर जिल्ह्यातील राज्यस्तरीय खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते ट्रॅकसूटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी , नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत साताऱ्यात योगदिन साजरा
RELATED ARTICLES