सातारा : भारतीय हिंदू संस्कृती मध्ये उगम पावलेले योगशास्त्र आज निरोगी जीवनाची गुरुकिल्ली म्हणून जगभर प्रसिध्द आहे. स्वामी विवेकानंदानी या शास्त्राचा जगभर प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली व या घोषणेस संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली.
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अजिंक्यतारा हरी ॐ किल्ला ग्रुपच्यावतीने सकाळी अजिंक्यतार्यावर अल्हाददायक वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात योगदिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ योगशिक्षक धनंजय पारखी यांनी निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आणि तंत्रशुध्द योगासनाचे धडे उपस्थित सर्व सदस्यांना दिले. या प्रसंगी धनंजय पारखी यांचेसह प.नी.चव्हाण, गणेश राजोपाध्ये, नंदकुमार देशपांडे, काळोखे या योगशिक्षकांचा तसेच भाजपाच्या नगरसेविका प्राची शहाणे यांचा सत्कार आप्पा कोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
हरी ॐ अजिंक्यतारा किल्ला गु्रपचे अध्यक्ष आप्पा कोरे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या व वेगवान जीवनात प्रत्येकाने मन:शातीं व उत्तम आरोग्यासाठी योगासनांची नितांत गरज आहे.
प. नी. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व गजानन भोसले यांनी उपस्थित नागरीक, सदस्य व या कार्यक्रमास सहकार्य करण्यार्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरी ॐ अजिंक्यतारा किल्ला गु्रपचे सदस्य अविनाश वांकर, बाळासाहेब पाटुकले, दत्ता मोरे, गजानन भोसले, शैलेश धबधबे, भैय्यासाहेब साळुंखे, महेश लोया, श्रीपाद जोशी, प्रमोद बहुलेकर, सुधाकर सावंत, बाळासाहेब कुटे, सारंग जाधव, वासुदेव डीके, नामदेवराव गिड्डे, विठ्ठल देवरे, हणमंत चव्हाण, निलेश शहा यांनी परिश्रम केले.
हरी ॐ अजिंक्यतारा किल्ला ग्रुपचा योगदिन उत्साहात साजरा
RELATED ARTICLES