सातारा : श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून उभारलेल्या संगम माहूली येथील कैलास स्मशानभूमीत भविष्याचा विचार करून लवकरच गॅस दाहिनी बसविण्यात येणार असल्याची ाहिती श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री. राजेंद्र चोरगे यांनी दिली.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, सदर गॅस दाहिनी ही ङ्गक्त कॅन्सर, दुर्धर आजार किंवा पोस्ट मॉर्टम झालेल्या मृत व्यक्तिंच्या तसेच मृत व्यक्तिंच्या पश्चात (पाठीमागे) घरी अंत्यसंस्कार करणेसाठी ङ्गक्त महिला वर्ग किंवा कोणीच नसते अशा मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिणीचा वापर करण्यात येणार आहे.
ही गॅस दाहिनी उभारणेसाठी पूर नियंत्रण रेषा याचा विचार करण्यात येणार असून, अंत्यसंस्कार होत असताना धूर ङ्गिल्टर होऊन 100 ङ्गूट उंचीची चिमणीद्वारे सोडण्यात येणार आहे. तसेच अंत्यसंस्कारचे चेंबर हे संपूर्ण स्टेनलेस स्टील (डड) स्टील मध्ये असून लिफ्टची सोय करणेत येणार आहे. यासाठी सुमारे रु.75 लाख खर्च होणार आहे.
2003 साली उभारलेल्या या कैलास स्मशानभूमीत आजपर्यंत जवळपास 28050 अंत्यसंस्कार करण्यात आले असून कोवीड काळात 4500 चे वर अंत्यसंस्कार हे कोणत्याही प्रकारची मृतदेहाची अवहेलना न होता वेळेवर अंत्यसंस्कार करून शासनाला मदत करणारी एकमेव संस्था आहे. या स्मशानभूमीच्या निर्मिती पासूनच प्रदूषण कमी व्हावे म्हणून श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने अंत्यसंस्कारासाठी लाकडाच्या ऐवजी शेणीचा वापर केल्यामुळे आज पर्यंत झाडांची कत्तल थांबून 35 ते 40 हजार झाडे वाचली आहेत. अंत्यसंस्कार झाले नंतर उरलेली राख, अस्थी पाण्यात न टाकता अस्थी कुंडात साठवून त्यापासून खत निर्माण केले जात आहे. अंत्यसंस्कारासाठी येणार्या व्यक्ति कोणत्याही प्रकारचे व्यसन (गुटखा, पान, दारू) करून आत येणेसाठी बंदी ठेवली आहे.
कैलास स्मशानभूमीत लाईटचे नियोजन सोलरवर केले आहे. सर्व बाजूने झाडे लावून त्याची देखभाल केली आहे. स्वत:च्या घरासारखी स्वच्छता कायम याठिकाणी 7 कर्मचार्यांच्या माध्यमातून ठेवली जात आहे. आता गॅस दाहिनी या नवीन उपक्रमामुळे आणखीन काही प्रमाणात प्रदूषण रोखण्यासाठी उपयोग होईल..
अशा प्रकारची संगम माहूली सातारा येथील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण झालेली आणि देखभाल करून कोणतेही शासकीय आणि नगरपालिका यांचे अनुदान नसताना चालविण्यात येणारी भारतात एकमेव स्मशानभूमी आहे, आणि हे सर्व सातारकरांच्या आणि दानशूर व्यक्तिंच्या सहकार्यामुळे होत आहे. गॅस दाहिनीमध्ये होणारे अंत्यसंस्कारा व्यतिरिक्त अंत्यसंस्कार हे नेहमी प्रमाणे अग्निकुंडात शेणीमध्ये केले जातील.
कैलास स्मशान भूमीत लवकरच गॅस दाहिनी बसणार : राजेंद्र चोरगे
RELATED ARTICLES