साताराः कोणताही गौरव किंवा पुरस्कार मोलाचा असतोच, परंतु अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ या आमच्या संघाने दिलेला पुरस्कार मला जास्त मोलाचा वाटतो अश्या शब्दात अरुण गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कौशिक प्रकाशनने प्रसिध्द केलेल्या अरुण गोडबोले लिखित .. सिनेमाचे दिवस .. या पुस्तकास संघातर्फे दिलेल्या सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार स्विकारताना ते बोलत होते.
करसल्लागाराच्या व्यावसायिक ऋणातून उतराई होण्यासाठी म्हणुन ..प्राप्तीकराशी मैेत्री.. हे आयकर कायद्याची सविस्तर माहिती देणारे पहिलेच पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मी 1992 साली कौशिक प्रकाशनाची स्थापना केली.गेल्या 24 वर्षात दीडशेहून जास्त दर्जेदार पुस्तके प्रकाशित करुन कौशिकने आज स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.माझी पत्नी सौ अनुपमा व कुटुंबिय आणि सर्व सहकार्यांचा यात वाटा आहे असेही ते पुढे म्हणाले. पुणे येथे झालेल्या या कायर्ंक्रमास प्रकाशन व्यवसायातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून झालेला गौरव मोलाचाः अरुण गोडबोले ; कौशिक प्रकाशनच्या सिनेमाचे दिवस या पुस्तकास सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार
RELATED ARTICLES