पाटण :- पाटण तालुका म्हणल की पाऊसाळी पर्यटनासाठी एक अफलातून पर्वणीच सह्याद्रीच्या डोंगर रांगा दऱ्या-खोऱ्यातून जंगलाच्या हिरवाईतून कोसळणाऱ्या उंचच उंच धबधब्यासाठी प्रसिध्दीच्या झोतात येत आहे. केरा नदीवरील भारसाखळेचा धबधबा. कोयना, केरा, मोरणा, तारळी, वांग, मांड खोऱ्यात कुठेही जावं सह्याद्रीच्या डोंगरावरुन कोसळणारे व फेसाळणारे धबधबे नजरेस पडणार नाही असे होणार नाही. असाच एक नाविन्यपूर्ण नुकताच सोशल मिडीयावरुण प्रकाश झोतात आलेला केरा नदीच्या उगमस्थाना जवळच चारधारा भारसाखळेचा धबधबा.. सर्वात उंच सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून कोसळणारा हा धबधबा सर्वांना आकर्षित करीत आहे.
पाटण तालुक्यातील निवकणे श्रीजानाईच्या खोऱ्यात निवकणे धरणापासून जवळच असलेल्या केरा नदीवरील भारसाखळे धबधब्याकडे जाण्यासाठी निवकणे धरणाच्या डाव्या बाजूने पाय वाटेने पुढे पायी चालत गेल्यावर पंधरा – वीस मिनटाच्या अंतरावर या धबधब्याजवळ जाता येते. सह्याद्रीच्या दाट झाडीतून दऱ्याखोऱ्यातून कोसळणाऱ्या चार धारा या धबधब्याचे द्रुश्य नजरेस पडताच निसर्गाचा अवलिया चमत्कार प्रत्यक्ष नजरेस पडावा असाच आहे. पाटण तालुक्यातील सर्वात उंच ठरलेला हा धबधबा अलीकडे सोशलमिडीयावर धुमाकूळ घालत आसताना पाऊसाळी पर्यटकांची पाऊले आपसूकच निवकणे जवळील भारसाखळे धबधब्याकडे वळत आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील बघताक्षणी मन हेलावून ठाकणारा केरा नदीवरील हा धबधबा पाऊसाळी पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे. यामुळे या धबधब्याकडे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या धबधब्यापासून जवळच प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेले निवकणे जानाई देवीचे मंदिर आहे. जळव खिंड, सडावाघापूर उलटा धबधबा, तलवार विहीर असलेला सुंदरगड, धारेश्वर दिवशी धबधबा, के टू पॉईंट काठीटेक हि पर्यटन स्थळे आहेत. कुटुंबा सोबत अथवा मित्र- मैत्रीणी सोबत या एक दिवसाच्या वर्षा सहलीचा आनंद नावीन्यपूर्ण पर्यटणाची पर्वणीच ठरेल. या धबधब्याकडे येण्यासाठी सातारा- नागठाणे- तारळे, जळव, मणदुरे, निवकणे (निवकणे धरण डावा तीर) असा एक मार्ग आहे. तर दुसरा मार्ग कराड- पाटण, चापोली निवकणे धरण असा एक मार्ग आहे.
केरा नदीवरील भारसाखळेचा चारधारा धबधबा निसर्गाचा अवलिया चमत्कार ; सोशलमिडीयावर धबधब्याचा धुमाकूळ
RELATED ARTICLES