भुईंज : ऊस तोड मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने पुढील गळित हंगामात ऊस तोड यांत्रिकीकरणाची व्याप्ती वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि केन हार्वेस्टर उत्पादक कंपन्यांकडून उस्त्फुर्तपणे स्वागत होत असतानाच भुईंज येथील शेतकरी सुरेश चिकणे यांनी याच हंगामात न्यु हॉलंड कंपनीचे नवे केन हार्वेस्टर मशीन खरेदी करून कारखान्याच्या तोडणी वाहतुक यंत्रणेत दाखल करून व्यवस्थापनाच्या निर्धाराला बळ दिलेले आहे. दरम्यान, या केन हार्वेस्टरचे पुजन कारखान्याचे संचालक विजय चव्हाण, माजी संचालक रोहिदास पिसाळ, न्यु हॉलंड कंपनीचे स्टेट हेड मॅनेजर सुरेद्र बामणोटे, राजीव शहा, शंकरराव दुधे, चंद्रकांत देवीकर, श्रीरंग इंगवले यांच्या हस्ते आणि कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजन करण्यात आले.
ऊस तोड मजूरांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर किसन वीर उद्योग समुहाने पुढील गळित हंगाम 2018-19 पासून यांत्रिकी ऊस तोडणीला प्राधान्य देताना पंचवीस केन हार्वेस्टर (ऊस तोडणी यंत्र) ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेत दाखल करण्याचा महत्वपुर्ण निर्णय तीन आठवड्यांपुर्वी घेतलेला होता. पुढील गळीत हंगामात पंचवीस केन हार्वेस्टर मशीन वैयक्तिक शेतकरी, शेतकर्यांचा समुह, महिला बचत गट यांच्यामार्फत कारखाना व्यवस्थापनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आणि त्यासाठी लागणारे कर्ज बँकेकडून उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणार असल्याचेही व्यवस्थापनाने जाहीर केले होते. या पार्श्वभुमीवर भुईंज येथील केन हार्वेस्टर व्यावसायिक सुरेश चिकणे यांनी पुढील हंगामाची वाट न पाहता याच हंगामात केन हार्वेस्टर खरेदी करून कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले व संचालक मंडळाने ऊस तोड यांत्रिकीकरणाच्या केलेल्या निर्धाराला खर्या अर्थाने बळ दिलेले असून त्यामुळे अधिकाधिक शेतकरी, शेतकर्यांचा समुह कारखान्याच्या या योजनेत सहभागी होण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. दरम्यान, केन हार्वेस्टर पुजनप्रसंगी कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, आर्किटेक्ट संजय जगताप, अॅग्री मॅनेजर विठ्ठलराव कदम, एरिया मॅनेजर किरण पाटील, सागर कदम, शेखर भोसले-पाटील, पंकज शहा, सुनिल शिवथरे, भानुदास मदने, जितेंद्र कदम, गोरख केंजळे, संभाजी शिंगटे, शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.