Monday, May 19, 2025
Homeताज्या घडामोडीनॉलेज इज पॉवर ही संकल्पना समाजघटकांनी स्वीकारावी: फडतरे

नॉलेज इज पॉवर ही संकल्पना समाजघटकांनी स्वीकारावी: फडतरे

साताराः नॉलेज इस पॉवर या संकल्पनेतून समाजरचना साकारत असते.तेव्हा समाजातील सर्व स्तरातील घटकांनी लाभ घ्यावा.आधुनिक युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.तेव्हा लहान बालकापासून वृद्धापर्यंतचे साहित्य उपलब्ध झाले असून सेंटरचा लाभ घ्यावा.असे आवाहन शिवराय फुशांबु ब्रिगेडचे संस्थापक तथा गार्डन सिटी असोसिएशनचे चेअरमन चंद्रकांत फडतरे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॉलेज रिसोर्स सेंटरचे शानदार उदघाटन फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले .तेव्हा ते उदघाटनपर मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी वाय.सी.कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.अमोल खोब्रागडे होते.यावेळी पशुधन विभाग-विकासाधिकारी डॉ.उमेश मस्के, माजी बँकाधिकारी बी.एल.माने,लोकायत प्रकाशनचे राकेश साळुंखे,पाटणकर वाचनालयाचे संचालक अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
फडतरे म्हणाले,या सेंटरचे अनुकरण इतर समाजघटकांनी करावे. तरच खर्‍या अर्थाने नवभारत निर्माण होईल.शिवाय,विविध स्पर्धेतही सुयश मिळेल.
औपचारिक उद्घाटनासह ुुु.ीर्राीवरूळर्ज्ञींळज्ञरी.ेीस या वेबसाईचेही लोकार्पण करण्यात आले.यावेळी अनेकांनी स्तुतीयुक्त मनोगत व्यक्त केले.
सदरच्या सभेस पंचशील प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संकेत मस्के,अशोक गायकवाड(हमदाबाद),अनिल साळवे,सौ.सुमन फडतरे,मुख्याध्यापक चंद्रकांत मस्के,विविध क्षेत्रातील कार्यकर्ते,सातारा-गोडोली येथिल नागरिक व महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular