जिल्ह्यात पावसाची उघडझाप; कोयना धरणात 23.54 टीएमसी पाणीसाठा
सातारा : सातारा जिल्ह्यात पावसाची उघड झाप सुरु असून सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास धरण पुर्ण क्षमतेने भरले असून या धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. कोयना धरणात 23.54 टी.एम.सी. पाणी साठा झाला असून आज 1 टीएमसीने वाढ झाली आहे. तर कोयना पाणलोट क्षेत्रात 14 मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने अद्याप खरीप पेरणीची खोळंबलेली कामे आज संपुर्ण दिवसभर 11 तालुक्यात पहायला मिळाली. नवजा येथे 54 मि.मी., महाबळेश्वर 34 मि.मी., धोम 1 मि.मी., कण्हेर 2 मि.मी., भाटघर 4 मि.मी, वीर, महु या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली होती. उरमोडी 6 मि.मी., धोम-बलकवडी 19 मि.मी., हातगेघर 4 मि.मी., नागेवाडी 14 मि.मी., मोरणा-गुरेघर 19 मि.मी., उत्तरमांड 20 मि.मी., तारळी 7 मि.मी, निरा-देवघर 14 मि.मी., वांग 45 मि.मी, एवढा पाऊस झाल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात झाली आहे. तालुका निहाय आज झालेल्या पावसामध्ये सातारा 4.1मि.मी, जावली 4.3 मि.मी., पाटण 14 मि.मी, कराड 4.4. मि.मी., कोरेगाव 1.1 मि.मी, खटाव 1.6 मि.मी, माण 0.4 मि.मी, फलटण 1.0 मि.मी, खंडाळा 1.7 मि.मी, वाई 1.7 मि.मी, महाबळेश्वर 33.6 मि.मी, असा एकुण 67.9 मि.मी, इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कराड, पाटण, सातारा तालुक्यातील परळी भाग, जावली या तालुक्यात भात लागण मोठ्या प्रमाणात होत असती. भात लागणीसाठी अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याचे भात लागवड अद्याप सुरू झालेली नाही. दरम्यान आज पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांनी घात मिळेल तशी राहिलेली पेरणी पुर्ण करण्यासाठी संपुर्ण दिवसभर लगभग सुरू असल्याची पहायला मिळाली. जूनमध्ये धुळवाफीवर पेरणी झालेल्या पिंकांची उगवण क्षमता चांगली झाली असून