पाटण : कोयना धरणाच्या शिवाजी सागर परिसरात सुरू आसलेल्या मुसळदार पाऊसाने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.नदी पात्रात पुर परस्थिती निर्माण होऊ नये म्हणून व पुरपरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने रविवारी सकाळी 11 वा. धरणाचे सहा वक्र दरवाजे 2 फुटाने उघडून नदीपात्रात 10,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासकीय यंत्रणेकडुन नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान शनिवारी सकाळी 11 वा. पायथा विज गृहातून 2111 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरू केले आहे.
पाऊसाच्या दुसर्या टप्यातील सहाव्या दिवशी कोयना धरणाच्या शिवाजी सागर परिसरात पाऊसाची धुवाँधार सुरू आसुन धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात येणार्या पाण्याची आवक प्रतिसेंकद 42500 क्युसेक्स सुरू आसुन पाणी पातळी 2144 फुट 2 इंच झाली आहे. तर पाणी साठा 85 टि.एम.सी. झाला आहे. धरण पुर्ण क्षेमतेने भरण्यासाठी केवळ 20 टि.एम.सी. पाण्याची आवश्यकता आहे. पाऊसाची सततता कायम सुरू आसल्याने गेल्या पाच ते सहा दिवसात 24 तासातली आवक 4ते7 टि.एम.सी. इतकी होत आहे. धरणातील आवक पाहता रविवारी सकाळी 11 वा. सहा वक्र दरवाजातुन पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. यामुळे नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा शासकीय यंत्रणेकडुन देण्यात आले आहेत.
या संदर्भात आ.शंभुराज देसाई यांनी पाटण तहसिल कार्यालयात अधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना संबंधित गावात सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. यावेळी तहसिलदार रामहरी भोसले, कोयना प्रकल्पाचे डी.ऐ. बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. धरण परिसरातील पाऊसाचे प्रमाण कमी-जास्त पाहून वेळो-वेळी कमी-जास्त प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल आसे बगाडे यांनी सांगितले. तर पुर परिस्थितीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही.यासाठी महसुल विभाग सतर्क आहे. असे तहसिलदार रामहरी भोसले यांनी सांगितले. गेल्या24तासात कोयना-190 मि.मी.नवजा-215मि.मी.तर महाबळेश्वर-195मि.मी.पाऊसाची नोंद झाली आहे.पाटण तालुक्यात सर्वत्र पाऊसाची धुवाँधार चालू आसुन तालुक्यातील कोयना, केरा, मोरणा, तारळी, वांग, उत्तर मांड, काजळी, काफना या सर्व नद्या दुतड्या भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडणार
RELATED ARTICLES