सातारा : सातारा पालिकेच्या प्रशासनाच्या कारभाराची सत्ताधारी पदाधिकार्यांनी लक्तरेच काढली. शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद आहेत. तक्रारी करूनही पालिकेचे विद्युत अभियंता सुर्यकांत साळुंखे कामे करीत नाहीत. नागरीकांना अंधारात रहावे लागत आहे. अशा अधिकार्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करून साळुंखेना शॉक दिला आहे. दरम्यान शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. टेंडरची फाईल नसतानाही ठेकेदाराला 30 लाखाची बीले देण्यात आली आहेत. टेंडरची फाईल पालिकेतून गायब होते कशी यावरून सर्वच सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरत कारभाराची लक्तरे काढली.
पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृहात पार पडली. यावेळी विषय पत्रिकेवरील 46 विषयांना गदारोळात मंजूरी देण्यात आली. विषयांना मंजूरी देण्यापुर्वी सातारा शहरातील पथदिव्यांचा विषय सभागृहात चर्चेला आला. नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी सदरबझार भागात गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्यावरील दिवे लागत नाहीत. पालिकेचे अभियंता सुर्यकांत साळुंखे यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पदाधिकार्यांनी सांगून कामे होत नसतील सर्वसामान्य जनतेची कामे असे अधिकारी कसे करणार. नगरसेविका मुक्ता लेवे म्हणाल्या, साळुंखे यांना निलंबीत केले तरी त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाते. सेवेत घेण्यामागे नेमका कोणाचा हात आहे. शहरातील अनेक भाग अंधारात आहे. सर्वच नगरसेवकांच्या साळुंखे यांच्या कामाजावर नाराजी व्यक्त करत आहेत. तरीही त्यांना पाठीशी घातले जाते. अशा अधिकार्याला घरी पाठविला पाहीजे अशी मागणी केली.
शहरातील रस्त्यावरील बंद दिव्यावरून विद्युत अभियंता साळुंखे यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकार्यांना धारेवर धरले. प्रविण पाटील म्हणाले, विद्युत विभागातील सावळा गोंधळामुळे पालिकेला लाखो रूपयांचा भुर्दंूड बसत आहे. अशोक मोने म्हणाले, विद्युत अभियंता साळुंखे हे पालिकेतील ङ्गनदिबैलफ आहेत. सदस्यांनी सांगितले की, तेवढ्यापुरते मान डोलावाच काम करतात. साळुंखेवर आत्तापर्यंत चार ते पाच वेळा निलंबनाची कारवाई होते पुन्हा त्याला घेतले जाते. त्यापेक्षा ठेका पध्दतीने अभियंत्याची नेमणुक करून साळुंखेना कायमचे घरी पाठवावे अशी मागणी नगरसेवक महेश जगताप, जयेंद्र चव्हाण, रवि पवार यांनी केली.
दरम्यान शहरात एलईडी पथदिव्यांच्या मुद्यावरून पालिकेत घमासान चर्चा झाली. शहरात अनेक ठिकाणी एलईडी दिवे बसविले मात्र काही ठिकाणी लागतच नाहीत. एलईडीचा ठेका सांगलीच्या ठेकेदाराला दिला असल्याने तक्रार कोणाकडे करायची. पालिकेच्या विद्युत विभागात तक्रार केली तर एलईडीचा विषय आमचा नाही असे हात झटकून मोकळे होतात. एलईडी दिवे बसविण्याचे काम अपूर्ण असताना टेंडरची फाईल नसताना ठेकेदाराला 30 लाख रूपये बील देण्यात आले आहे. टेंडरची फाईल पालिकेतून गायब झाली असताना ठेकेदारला बीले दिली कशी जातात असा सवाल नगरसेवक अशोम मोने, जयेंद्र चव्हाण, रवि पवार आदींनी उपस्थित केला. यावर खुलासा करताना मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, टेंडरची फाईल जर मिळून आली नाही तर संबधित अधिकार्यांवर फाईल गायब झाली म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर सभागृहातील गोंधळाचे वातावरण शांत झाले.
कुत्रिम तळ्यासाठी कायम स्वरूपी जागेची मागणी करावी
गणेश विसर्जनावरून पालिका सभेत पुन्हा चर्चा रंगली. नगर अभियंता भाऊसाहेब पाटील म्हणाले, कुत्रिम तळे निर्मितीसाठी 15 लाखाची तरतुद केली आहे. मात्र ती अपुरी आहे. गणपती विसर्जनासाठी कुत्रिम तळी उभारणीसाठी 58 लाख रूपये लागत आहे. पालिकेची स्थिती नसल्यामुळे गणेश मंडळांनी शाडू मातीच्या लहान मुर्ती बसवाव्यात म्हणजे विसर्जनास सोपे जाईल. यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. गणेश मंडळांच्या गणेश मुर्ती तयार झाल्या आहेत. पालिकेला कुत्रिम तळे शक्य नसेल तर पुर्वी प्रमाणे मंगळवार तळे, मोती तळ्यांमध्ये विर्सजनास परवानगी द्यावी अशी मागणी नगरसेवक अशोक मोने यांच्यासह अनेकांनी केली. यावर नगरसेविका जोशी, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम यांनी या तळ्यांमध्ये विसर्जन करण्यास आक्षेप घेतला. प्रशासनाने कुत्रिम तळ्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे कायम स्वरूपी जागेची मागणी करावी पालिका एकदाच खर्च करेल अशी मागणी सभागृहात नगरसेवकांनी केली.
एलईडी टेंडरच्या फाईल विनाच 30 लाखाचे बिल अदा
RELATED ARTICLES