सातारा : शेतकर्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत देण्याचा राज्य शासनाने काढलेला अध्यादेश रद्द करावा. या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, लोणंद, फलटण येथील शेती उत्पन्न बाजार समित्यामधील 225 आडते व्यापारी यांनी सोमवार दि. 11 पासून बेमुदत बंद जाहीर केला आहे.
या बंदमध्ये सातारा शेती उत्पन्न बाजार समितीमधील 55 अडत व्यापारी, सातारा शहरातील चार भाजी मंडई संघटना पदाधिकारी, विक्रेतेयांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती सातारा शेती उत्पन्न बाजार समिती व्यापारी गटाचे संचालक सोमनाथ धुमाळ व फळे भाजीपाला अडते असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना सोमनाथ धुमाळ म्हणाले, राज्यातील युती शासनाने अध्यादेश काढून शेतकर्यांनी उत्पादीत केलेला मात्र थेट ग्राहकांपर्यंत द्यावा, असे फर्मान काढल्याने आडत व्यापारी अडचणीत आले आहेत. वास्तविक शेतकर्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची थेट लिलावातून बोली करुन जास्त किंमतीला शेती मालाची विक्री होत असते. रोखीने अथवा तोंडी व्यवहाराने शेतकरी, व्यापारी यांच्यात दैनंदिन व्यवहार सुरु होते. या व्यवसायात अडत व्यापारी कमिशनवर काम करीत आले आहेत. मराठी भाषिकच या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आहेत. आम्हीही शेतकरी कुटुंबातील आहोत. आम्ही आमच्या न्याय व हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे.
आजपासूनच आमच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून फलटण शेती उत्पन्न बाजार समितीने सहभाग घेतला आहे. यामुळे फलटण पंढरपूर रोडवर रस्त्याच्या कडेला शेतकर्यांचा माल पडून राहिला आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी व्यापारी बांडगुळ आहेत, असे वक्तव्य केले आहे.
याचा आम्ही निषेध करीत आहे. उधारी तत्वावर आम्ही पैशाचे व्यवहार करीत असतो. सातारा शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक काटे बसविलेले असून सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यन्वित केली आहे. स्वच्छता गृह, उभारणी केली आहे. शेतकरी निवासाचे कामही सध्या सुरु आहे. पत्रकार परिषदेस फारुख़ बागवान, महंमदअली बागवान, विजय केंडे, राजूशेठ गोरे व अडत व्यापारी उपस्थित होते.
फलटणला व्यापार्यांचा बंद
फलटण शेती उत्पन्न बाजार समितीमधील अडत व्यापार्यांनी शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात शनिवारपासून बंदमध्ये सहभाग व बाजार समितीच्या गेटवच अडत्यांची दखल न घेता माल विक्रीला सुरुवात केली. त्यामुळे शाब्दीक बाचाबाची होवून तणावाचे वातावरण झाले होते. घेतला असून शेतकर्यांनी फलटण पंढरपूर रस्त्याच्या कडेला आणलेला शेतीमाल भर पावसात भिजल्यामुळे हजारो रुपयांचा माल नाशवंत झाला आहे.