सातारा : कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसतोडणी तसेच वाहतूकीचे काम करणाजया ठेकेदार आणि मजूरांची 2014-15 मधील बाकी देणी दिल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा ऊसतोडणी ठेकेदार आणि मजूरांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिला.
कृष्णा कारखान्याने 2014-15 मधील बाकी देणी अजूनही दिलेली नाहीत. ती देण्याच्या मागणीसाठी बीड जिल्हा ऊस तोड कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ठेकेदार आणि मजूरांनी कारखान्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र, गेले दीड वर्षेत्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हे बिल तत्काळ मिळावे, या मागणीसाठी संबंधित वाहतूक ठेकेदार आणि मजूरांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. हे उपोषण मागे घ्यावे म्हणून जिल्हा प्रशासनाने ठेकेदार आणि मजूरांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. दुपारी कृष्णा कारखान्याचे शेती अधिकारी सुर्यवंशी कारखान्याच्यावतीने एक पत्र घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी ऊसतोडणी कामगारांच्या प्रतिनिधींना त्यांच्या दालनात बोलावले होते. यावेळी कृष्णा कारखान्याने दिलेल्या पत्राची प्रत उपोषणकर्त्यांना वाचण्यास दिली. संबंधितांची देणी कारखान्याच्यावतीने दि. 15 जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिवनगर शाखेत जमा करण्यात येतील, अशा आशयाचा मजकूर त्यामध्ये होता. हे पत्र वाचल्यानंतर उपोषण मागे घेण्यात यावे, अशी विनंती यादव यांनी केली.
दरम्यान, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, शंकरराव गोडसे आणि त्यांचे सहकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर आणि त्यांच्या सहकाजयांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि पाठिंबा दिला.
शंकरराव गोडसे म्हणाले, आम्ही ऊसतोडणी कामगारांच्याबरोबर आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांना न्याय मिळवून देणार आहे. काही झालेतरी माघार घेणार नाही. ऊसतोडणी कामगारांच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजे. प्रसंगी शेतकरी संघटना जिल्हाभर आंदोलन उभे करणार असल्याचा इशाराही गोडसे यांनी यावेळी दिला.
दरम्यान, कृष्णा कारखान्याने पैस थकविल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे महसूलमंत्री सुभाष देशमुख आणि सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीकडेही सर्वांच्या नजरा