Saturday, May 17, 2025
Homeठळक घडामोडीसुरेश जैन यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

सुरेश जैन यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

नवी दिल्ली : घरकूल घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले माजी आमदार सुरेश जैन यांचा तुरूंगातील मुक्काम तुर्तास तरी कायम राहणार आहे. जैन यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे.
सुरेश जैन यांच्यावरील आरोपींची महिन्याभराच्या आत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत सुरेश जैन यांचा तुरूंगावास कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. घरकूल प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून सुरेश जैन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. जामीन अर्जावर आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीश जगदीशसिंग खेहर आणि अरुणकुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने जामीन अर्जावरील सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय दिला.
सरकारी पक्षाच्यावतीने आज न्यायालयासमोर घरकूल प्रकरणाच्या  सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्यात आला. अहवालाचे अवलोकन झाल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणातील उर्वरित साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular