मेढा प्रतिनिधी- रहिमतपूरच्या मातीसाठी सेवानिवृत्त शिक्षकांचे योगदान हे अत्यंत मोलाचे असून त्यांनी केलेल्या सन्मानाने मी भारावून गेलो आहे असे गौरव उद्गार रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष व लोकनेते सुनील माने यांनी काढले.
स्वर्गीय अण्णा देशपांडे स्मृति समता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वर्गीय राजीव गांधी आणि स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीचा उजाळा घेतला.
प्रारंभी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या प्रगतीचे कौतुक व बँकेचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे सांगितले. यावेळी आदर्श पोलीस पाटील म्हणून सन्मानित झालेले दीपक नाईक यांचाही सन्मान या प्रसंगी करण्यात आला. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे नूतन चेअरमन मा. राजेंद्र बोराटे, व्हाईस चेअरमन, विजय बनसोडे यांचाही यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी रहिमतपूरच्या नदीच्या कमंडलू नदीमध्ये असणारी ताकद, हीआम्हाला आयुष्यभर ऊर्जा देणारीआहे असे सांगितले , तसेच रहिमतपूर विभागाचे शिक्षक बँकेचे संचालक श्री सुरेश पवार यांनी शिक्षकांची कामधेनू असणाऱ्या शिक्षक बँकेचे कार्य असेच उत्तरोत्तर प्रगती पर नेण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्राध्यापक भानुदास भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन विजय बनसोडे, संचालक नितीन काळे, संचालक विजय ढमाळ, संचालक संजय संकपाळ, ज्ञानोबा ढापरे, उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ सभासद ज.ग .माने, उपसरपंच शहाजी कणसे, एन.टी. कदम,हणमंत माने. शिवाजी साळुंखे, ब.र.माईनकर, जनार्दन जाधव, तावरे, मारू मळे मॅडम, बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी, राजेंद्र माने, नितीन कारंजकर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक.शिवाजी माने यांनी केले,जगन्नाथ भोसले यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप कांबळे यांनी आभार मानले