सातारा – समाजात चांगले घडावे यासाठी सतत चांगुलपणा जपून विविध उपक्रम राबवणारे कार्यकर्ते चांगल्या समाजाचा आधार असतात. गौतम भोसले त्यापैकीच एक. म्हणूनच त्यांच्या मित्रांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन केलेला गौरव महत्त्वपूर्ण आहे, असे मत ज्येष्ठ करसल्लागार चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांनी व्यक्त केले.
गौतम भोसले मित्र परिवाराच्या वतीने गौतम भोसले यांचा कार्यगौरव नुकताच अरुण गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अरुण गोडबोले यांच्या हस्ते गौतम भोसले यांचा सन्मानपत्र देण्यात येऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गौतम भोसले यांच्या पत्नी सौ कुसुमताई भोसले यांचा सन्मान सौ. अनुपमा गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला.
गौतम भोसले यांच्या कार्याचा गौरव करतात अरुण गोडबोले म्हणाले की गौतम भोसले हे अजातशत्रू असे व्यक्तिमत्व आहे. समाज हिताचे व समाज परिवर्तनाचे काम त्यांच्या हातून यापुढेही घडावे यासाठी त्यांना सदिच्छा.
आपल्या हातून जेवढे म्हणून समाज हिताचे काम करता येईल तेवढे मी समाजाबरोबर राहून केलेले आहे यापुढेही ते करत राहीन असे सत्काराला उत्तर देताना गौतम भोसले यांनी सांगितले.
मानपत्राचे वाचन जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांनी केले. सूत्रसंचालन विजय मांडके यांनी केले. आभार उल्हास भिडे यांनी मानले. यावेळी डॉ अच्युत गोडबोले , सौ अनुपमा गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
चांगुलपणा जपणारेच कार्यकर्ते समाजाचा आधार असतात ; गौतम भोसले यांच्या सत्कार प्रसंगी अरुण गोडबोले यांचे उद्गार
RELATED ARTICLES