सातारा : सातारा जिल्ह्यातील लिंब – गोवे येथील कृष्णा नदीच्या पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यात एक युवक वाहून गेला आहे. रविंद्र भरत जाधव (वय:36, रा. गोवे) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. आज दुपारी एकच्या दरम्यान रविंद्र जाधव हा गावातील कोटेश्वर मंदिर येथे आला होता. यावेळी पाण्याचा प्रवाह कमी प्रमाणात होता. मात्र तो जात असताना गावातील पुलावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुलावरून जात असताना तो वाहून गेला. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीसांना समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून शोधाशोध केली मात्र रात्री उशिरापर्यंत रविंद्र जाधव सापडला नाही.
लिंब – गोवे येथील कृष्णा नदीच्या पुलावरून युवक गेला वाहून
RELATED ARTICLES