सातारा : बेकायदेशीररित्या परवाना नसताना दारू पिणार्या माजी नगरसेवकाच्या पुत्रासह पाच जणांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. याची फिर्याद पो.कॉ. प्रविण फडतरे यांनी दिली आहे. पालवी हॉटेल मालक संजय मारूती मोरे, कौस्तुभ प्रदीप कुलकर्णी (वय:31) रा. शाहुनगर, रणधीर अशोक इथापे (रा. संगमनगर), अमित बाळासाहेब नाईक (वय:22, रा. पंताचा गोट), सागर महादेव जाधव असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल दि. 2 ऑगस्ट रोजी रात्री 10.00 च्या सुमारास हॉटेल पालवी येथे वरील संशयित विना परवाना बेकायदेशीररित्या दारू पित असताना मिळून आहे. यावेळी हॉटेल मालक मोरे यांच्याकडे कोणताही परमिटरूमचा परवाना नसताना दारू पिण्यास परवानगी दिल्याने त्यांच्यावरही सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एसटी स्टॅन्ड परिसरात निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ चहाच्या टपर्या चालू ठेवल्याप्रकरणी टपरी चालक प्रदीप राजाराम देसाई (वय:45, रा.वाढे ता.सातारा) व रमेश मारूती यादव (वय:42, रा.पाटखळ) या दोघांवरही सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.